02:50pm | Nov 02, 2023 |
मुंबई : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला पुन्हा अपयश आले. वर्ल्ड कपमध्ये अपराजित भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करायला मैदानावर उतरला. २०११ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने खणखणीत षटकार खेचून श्रीलंकेला पराभूत करून वर्ल्ड कप उंचावला होता. त्यामुळे रोहितकडून घरच्या प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या आणि त्याने चौकाराने सुरुवातही चांगली केली, पण दिलशान मधुशंकाने टाकलेला दुसरा चेंडू रोहितचा त्रिफळा उडवून गेला. रोहितलाही काहीच समजले नाही अन् स्टेडियम शांत झाले.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने सलग ६ सामने जिंकून १२ गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यापर्यंत झेप घेतली आहे आणि आजचा विजय त्यांच्या अंतिम ४ मधील जागेवर शिक्कामोर्तब करणारा ठरणार आहे. रोहितने पहिला चेंडू चौकार खेचून २०२३ वर्ल्ड कपमध्ये ४०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. पण, मधुशंकाने दुसराच चेंडू अप्रतिम इनस्वींग टाकला आणि रोहितच्या बॅटीला चकवून तो ऑफ स्टम्प उडवून गेला. रोहितला ४ धावांवर माघारी जावे लागले. वानखेडेवरील वन डे सामन्यांत रोहितला ( १६ वि. आफ्रिका, २०१५; २० वि. न्यूझीलंड, २०१७; १० वि. ऑस्ट्रेलिया २०२०) फार कमाल करता आलेली नाही.
भारत : रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका : पथूम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशन हेमंथा, महिश थिक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथा चमिरा, दिलशान मधुशंका
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |