04:46pm | Mar 22, 2024 |
उन्हाळा म्हटलं की लिंबाचं थंडगार सरबत पाहिजेच. सरबत प्यायलं की कसं एकदम फ्रेश झाल्यासारखं, अंगात एनर्जी आल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात असं बऱ्याचदा होतं की या दिवसात लिंबू लागतात म्हणून आपण बाजारातून भरपूर लिंबू आणतो आणि ते फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण काही दिवसांतच ते खराब होतात. सडू लागतात. असं होऊ नये म्हणून जास्त दिवस लिंबू कसे टिकवून ठेवायचे, याचा हा सोपा उपाय एकदा पाहून घ्या. हा उपाय केल्यास अगदी ३- ४ महिने तरी लिंबांना काहीही होणार नाही.
लिंबू जास्त दिवस कसे टिकवायचे?
लिंबू जास्त दिवस कसे टिकवायचे याचा उपाय alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय केल्यास अगदी ६ महिने लिंबू चांगले टिकू शकतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
जेव्हा लिंबाच्या किमती एकदम कमी असतील तेव्हा भरपूर लिंबू घेऊन ठेवायचे. आणि लिंबू जेव्हा महाग होतील, तेव्हा अशा पद्धतीने साठवलेले लिंबू वापरायचे.
सगळ्यात आधी तर बाजारातून आणलेले लिंबू स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्यावरून हलकासा तेलाचा हात फिरवा.
तेल लावलेले लिंबू आता एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरा आणि फ्रिजरमध्ये ठेवून द्या. महिनोंमहिने या लिंबांना काहीही होणार नाही.
साठवलेले लिंबू कसे वापरायचे?
वरीलप्रमाणे तुम्ही लिंबू फ्रिजरमध्ये साठवून ठेवले असेल तर ते जेव्हा तुम्ही वापरायला काढाल तेव्हा ते एकदम कडक झालेले असेल.
त्यामुळे एका ग्लासमध्ये पाणी घ्या. पाणी रुम टेम्परेचरचे असावे. या पाण्यात आता अर्धा तास लिंबू बुडवून ठेवा. यानंतर लिंबू अगदी मऊ आणि रसरशीत झालेले असेल.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |

जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |