03:47pm | Nov 06, 2023 |
सातारा : येथील सुप्रसिद्ध मोटो क्रॉस खेळाडू श्लोक विक्रम घोरपडे यांनी नुकत्याच बेंगलोर येथे संपन्न झालेल्या एम आर एफ नॅशनल सुपर क्रॉस स्पर्धेच्या ठिकाणी दोन गटात प्रथम क्रमांक मिळवत तिसऱ्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला. आणि उपस्थित बेंगलोरकरांच्या वतीने त्याचा झालेल्या सत्कार आणि तो भारावून गेला आहे.
कर्नाटक पद्धतीची पगडी, पुष्पगुच्छ, मिठाई यांनी श्लोक घोरपडे याचे बेंगलोर निवासी प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सातारा येथील सुप्रसिद्ध प्रख्यात उद्योजक विक्रम घोरपडे व केएसडी शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या संचालिका सौ.आचल घोरपडे यांचा चिरंजीव श्लोक याने बेंगलोर येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये अतिशय वेगवान स्पर्धक म्हणून उपस्थित प्रेक्षकांची मने तर जिंकलीच याशिवाय एस एक्स वन या खेळ प्रकारात त्याने बाईक वरील अतिशय चुरशीचा खेळ दाखवत प्रथम क्रमांक मिळवला एस एक्स टू या गटात त्याने पुन्हा एकदा विशेष कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा मान कायम ठेवला. तर तिसऱ्या गटातील स्पर्धेमध्ये त्याला काही क्षणाचा विलंब झाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. एम आर एफ नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियनशिप राऊंड चार या स्पर्धेमध्ये श्लोक याने तीन विविध प्रकारामध्ये प्रत्येक प्रकारात दोन मोटो म्हणजे लॅप्स प्रकार करत इतर 50 प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ही स्पर्धा यशस्वीपणे जिंकली. इतर प्रतिस्पर्ध्यांनी केवळ दहा लॅप्स पूर्ण केलेल्या होत्या. सोळा वर्षीय श्लोक घोरपडे याने सहापैकी एकूण पाच रेसच्या प्रकारामध्ये ही आपली कर्तबदारी दाखवून चौथ्या एम आर एफ नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियनशिप मध्ये हे यश मिळवले आहे.
श्लोक याने के टी एम 250 cc ची बाईक या खेळासाठी वापरून आपल्या खेळाचे अतिशय सुंदर प्रदर्शन घडवले. त्याने तीन विविध पातळीवरील दोन प्रत्येकी मोटो पूर्ण करत पन्नास लॅप्स पूर्ण केल्या 16 वर्षाखालील गटात त्याला प्रथम क्रमांक एस एक्स टू गटात पहिला क्रमांक आणि गटात दुसरा क्रमांक मिळवला एस एक्स वन गटात केवळ एक पॉईंट ने तो मागे पडल्यामुळे त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या बेंगलोर येथील हजारो प्रेक्षकांनी श्लोक ची कामगिरी पाहून स्पर्धा पूर्ण झाल्यावर त्याचा विशेष रॉयल फेटा, बुके देऊन सन्मानित करून त्याचे कौतुक केले. या सत्काराने श्लोक अतिशय भारावून गेला होता. आपल्यावर झालेला प्रेमाचा तसेच शुभेच्छाच्या वर्षावाने तो खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी पात्र ठरवून आता पुढील कामगिरी नक्कीच यशस्वीपणे पार पडेल अशी अपेक्षा त्याच्या आई-वडिलांनी यावेळी व्यक्त केली.
श्लोकच्या दाखवलेल्या चमकदार कामगिरीचे वर्णन अनेक त्याच्या फॅन क्लब मित्रांनी सामाजिक माध्यमांवर छोटी व्हिडिओ क्लिप तसेच माहिती लिहून त्याला शुभेच्छा दिल्या. श्लोक हा खाजगी पातळीवर ही स्पर्धा पूर्ण करत असताना त्याला विक्रम घोरपडे यांचे पूर्ण योगदान मिळत असून श्लोक हा इतर स्पॉन्सर्शिप मिळवणाऱ्या मान्यवर कंपन्यांच्या स्पर्धकांबरोबर ही आपली कामगिरी करत असल्याने याचा विशेष आनंद होत असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. या विक्रमी कामगिरीबद्दल श्लोक याचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्याचे आजोबा व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, आजी सौ.उषा शानभाग तसेच विविध क्रीडा मान्यवरांनी अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |