सातारा : खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे लोकसभा निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील शासकीय कर्मचाऱ्याला नाकाबंदीदरम्यान गाडी तपासणी करताना पोलिसाने मी आमदार, खासदाराच्या गाड्या चेक करतो, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुहास विलास गुरव (रा. बनवडी काॅर्नर, कराड. मूळ रा. कनेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. तर अजय विलास माने (रा. म्हासुर्णे, ता. खटाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यामधील फिर्यादी हे कराड येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागात लिपिक आहेत. सध्या त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १७ रोजी रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांची ड्यूटी कराड-विटा मार्गावरील चोराडे फाटा येथे होती. त्यांच्याबरोबर इतर कर्मचारीही होते. वाहन तपासणीकामी सर्वांची नियुक्ती करण्यात आलेली.
दि. १७ रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास नाकाबंदी करताना कार (एमएच ११ डीएच ०४४९) थांबवली. त्यावेळी वाहनचालकास गाडीची तपासणी करायची आहे, असे म्हटले. यावरून संशयिताने मी पोलिस आहे. ओळखपत्र दाखवू का, मी आमदार, खासदाराच्या गाड्या तपासतो. तुमची लायकी आहे का, असे म्हणून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून सुहास गुरव यांना मारहाण करण्यात आली. यावेळी संशयिताने माझे नाव अजय माने आहे. मी पोलिस असून, सारोळा येथे नोकरी करतो. तुला काय करायचे ते कर, मी कोण आहे ते दाखवतो, अशी धमकीही दिली. त्यानंतर संशयित निघून गेला.
याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |