08:30pm | Apr 14, 2024 |
सातारा : कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीच्या संचालकांनी 4000 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे, असा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला. या आरोपाला आमदार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
मी स्वतः पत्रकारांना बाजार समिती येथे घेऊन जातो. तुम्ही स्वतः बाजार समितीमध्ये चौकशी करा. या सर्व गैरव्यवहारामध्ये माझे नाव आढळल्यास मी खासदारकीचा फॉर्म भरणार नाही, असे प्रति आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले. आमदार महेश शिंदे यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचेही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.
मुंबई बाजार समितीच्या गैरव्यवहार प्रकरणाचा गौप्यस्फोट आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या शक्ती प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी केला आहे. चार हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सातार्याच्या राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. सातार्यात प्रचाराच्या दरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून मी सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून शक्ती प्रदर्शनाने उद्या फॉर्म भरत आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्यांनी आजचा मुहूर्त का शोधला? माझ्यावरचे हे आरोप म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव आहे. गेल्या चार दिवसात सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने मी जात असताना सर्वसामान्य जनतेतून मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता आता लढण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यावेळेस असे आरोप होणे हे काय सूचित करते हे तुम्ही समजून घ्या.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी स्वतः आपणाला घेऊन जातो. तुम्ही स्वतः बाजार समितीत चौकशी करा, याची पूर्ण माहिती घ्या. या संदर्भात जर मी दोषी आढळलो तर मी फॉर्म भरणार नाही, असे आव्हान शशिकांत शिंदे यांनी देत या घोटाळ्याशी माझा काही संबंध नाही, असे स्पष्ट केले. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |