दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा यंदाचा हंगाम संमिश्र स्वरूपाचा सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांपैकी दिल्लीने ४ सामन्यांत विजय मिळवून ८ गुण कमावले आहेत. दिल्लीसाठी आनंदाची बाब म्हणजे, गेल्या ५ पैकी ३ सामने दिल्लीने जिंकले आहेत. असे असताना दिल्लीला काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. हॅमस्ट्रींग दुखापतीच्या उपचारासाठी डीसी चा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियात गेला होता. त्याने भारतात न परतण्याचा निर्णय घेत उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्या जागी आता दिल्लीला एक दमदार खेळाडू मिळाला आहे. अफगाणिस्तानच्या गुलबदीन नईबला दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल करून घेण्यात आले आहे. गुलबदिन याआधी कधीही खेळलेला नाही त्यामुळे त्याचा हा पहिलाच हंगाम असणार आहे.
अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये १ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या आगामी T20 World Cup 2024 आधी पूर्णपणे तंदुरूस्त होण्याच्या उद्देशाने मिचेल मार्श याने आयपीएलकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचा गुलबदिन नईब याला मिचेल मार्शची रिप्लेसमेंट म्हणून संघात करारबद्ध करण्यात आले आहे. गुलबदिन हा आयपीएल मध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे. गुलबदिनला ५० लाखांच्या मूळ किमतीसह दिल्ली संघाने करारबद्ध केले आहे.
मिचेल मार्शने दिल्ली संघाकडून यंदाच्या हंगामात केवळ ४ सामने खेळला. त्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. मिचेल मार्श ३ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शेवटचा खेळला होता आणि त्यानंतर तो मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. वर्ल्ड कप स्पर्धेत मार्शकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे दुखापत झाल्यावर तो लगेच मायदेशात परतला. MI विरुद्धच्या सामन्यापूर्वी तो भारतात परतणे अपेक्षित होते. पण त्याने माघार घेतली. त्याने दिल्लीकडून ४ सामन्यांत ६१ धावा केल्या आणि फक्त १ विकेट घेतली.
याआधी लुंगी एनगिडीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आणि हॅरी ब्रूकनेही वैयक्तिक कारणास्तव आयपीएल खेळणे टाळले. डेव्हिड वॉर्नर व इशांत शर्मा यांनाही दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळे दिल्लीच्या मागची दुखापतग्रस्तांची मालिका संपत नसतानाच, बदली खेळाडूमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |