07:13pm | Nov 15, 2023 |
मुंबई : सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडत विराट कोहलीने वर्ल्डकप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत ५०व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटने हा विक्रम नावावर केला. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. बुधवारी मुंबईत उष्ण आणि आर्द्र वातावरणातही विराटने संयमी खेळ करत खणखणीत शतकाची नोंद केली. विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर ट्वेन्टी२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं वनडेतलं न्यूझीलंडविरुद्धचं हे सहावं शतक आहे. मायदेशातलं कोहलीचं हे २२वं शतक आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दिलेल्या ७१ धावांच्या सलामीनंतर रोहित बाद झाला. विराटने नेहमीप्रमाणे एकेरी दुहेरी धावांसह डावाला सुरुवात केली. प्रचंड उकाड्यामुळे विराटलाही क्रॅम्प्सचा त्रास जाणवला मात्र या कशानेही त्याच्या एकाग्रतेवर परिणाम झाला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी नसणाऱ्या विराटने या शतकासह सगळं अपयश धुवून काढलं. शतकानंतर मैदानात उपस्थित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कुर्निसात करत विराटने ५०वं शतक साजरं केलं. टीम साऊदीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा कोहलीचा प्रयत्न डेव्हॉन कॉनवेच्या हातात जाऊन विसावला. विराटने ९ चौकार आणि २ षटकारांसह ११७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. विराटच्या शतकी खेळींचं वैशिष्ट्य म्हणजे भागीदाऱ्या. विक्रमी ५०व्या शतकादरम्यानही विराटने भागीदाऱ्यांची परंपरा कायम राखली. विराटने शुबमन गिलच्या साथीने ८६ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली. दुखापतीमुळे गिल तंबूत परतल्यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने १२८ चेंडूत १६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |