सातारा : येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अॅण्ड रीलिजियस सोसायटी चे के.एस.डी. शानभाग विद्यालय व महाविद्यालय येथे 2023 चे वार्षिक क्रिडा मेळाव्याचा शुभारंभ धनुर्धारी कु.अदिती गोपीचंद स्वामी व तिचे प्रशिक्षक (गुरु) प्रविण सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला.
शानभाग विद्यालयात दरवर्षी प्रमाणे दि. 30 डिसेंबर 2023 रोजी वार्षिक क्रिडा सामने आयोजीत केले गेले. याच्या शुभारंभासाठी कु. अदिती स्वामी व प्रशिक्षक प्रविण सावंत ही अतुलनीय गुरु-शिष्यावी जोड़ी लाभली. आदिती स्वामी ही महाराष्ट्रातील एक तिरंदाज आहे 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ती वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी व सर्वात लहान वयाची भारतीय तिरंदाज खेळाडू ठरली .
साताऱ्यासाठी ही अभिमानास्पद अशी गोष्ट असून तिला नुकताच अर्जुन पुरस्कारही जाहीर करण्यात आला यावेळी प्रवीण सावंत सरांनी शानभाग शाळेतील मुलांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले.
पालकांना मार्गदर्शन करताना आपल्या पाल्याच्या खेळासाठी पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आवाहन करत मुलांना भारताच्या राष्ट्रगीताचे 52 सेकंद याचा अभिमान व स्मरण ठेवून प्रत्येक खेळात पुढे जाण्यासाठी आवाहन केले आणि मुख्यत्वे करून शानभाग शाळेतील सर्व खेळांसाठी असलेली सोयी सुविधा व योग्य प्रशिक्षण याबाबत कौतुक केले. आदिती स्वामी हिने मुलांना एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून खेळ खेळा आणि त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न व कष्ट करत रहा असे आवाहन केले.
शानभाग शाळेचे संस्थापक रमेश शानभाग सर, संचालिका सौ. आँचल घोरपडे, मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड व मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व क्रीडा सामन्यास सुरवात झाली. यावेळी विविध खेळात प्राविण्य व गुणवत्ता मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |