नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर कधी होणार याची उत्सुकता आहे. विराट कोहली तिसऱ्या व चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. पाचव्या कसोटीतही त्याच्या खेळण्यावर संभ्रम आहेच. लोकेश राहुल याचे पुनरागमन निश्चित असले तरी रवींद्र जडेजाबाबत स्पष्टता नाही. अशात मोहम्मद सिराजचे पुनरागमन होतेय, परंतु त्याचवेळी प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे.
दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून ९ विकेट्स घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहने जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून इतिहास रचला. तो कसोटी क्रमवारीत नंबर १ स्थानावर विराजमान झालेला भारताचा पहिलाच जलदगती गोलंदाज बनला. यापूर्वी आर अश्विन, रवींद्र जडेजा व बिशन सिंग बेदी यांनी अव्वल स्थान पटकावले होते. तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन स्थानावर विराजमान होणारा जस्सी हा विराट कोहलीनंतर तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
सततचे क्रिकेट लक्षात घेता जसप्रीतला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती. भारतीय संघाला ११ फेब्रुवारीपर्यंत राजकोट येथे एकत्रित येण्याच्या सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे, परंतु यात खेळायचे की नाही, याचा निर्णय बीसीसीआयने आता जसप्रीतवर सोडला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने एक अहवाल निवड समितीकडे सोपवला आहे. त्यात खेळाडूंच्या वर्क लोड नियंत्रणावर भर दिला गेला आहे. त्यामुळेच जसप्रीतने याचा विचार करून तिसरी कसोटी खेळायचे की नाही हे ठरवायचे आहे.
जसप्रीतच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराजवर जलदगती माऱ्याचा भार असेल. त्याला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली गेली होती.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |