10:44pm | Mar 29, 2024 |
कराड : कराड शहरातील भाजी मंडई, कसाईवाडा गुरवार पेठ येथील ५ ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून गोवंश जातीची एकुण ४० जनावरे कत्तलीकरीता बांधुन ठेवल्याचे अढळुन आले. तसेच सुमारे १५८० किलो मांस कातडेसह आढळून आले.
मुजावर कॉलनी येथे देखील ४ गोवंश जातीच्या गाई कत्तलीकरीता बांधुन ठेवल्याचे आढळून आले. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी के.एन. पाटील, डीबी पथक प्रमुख पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक अझरुददीन शेख महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने आर.सी.पी पथक यांचे सहय्याने तात्काळ गोवंशाची सुटका करण्यात आली व त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली तसेच पशुवैदयकीय अधिकारी यांचे समक्ष गोमंस जप्त करण्यात आले.
या कारवाई मध्ये अत्तापर्यंत संशयित मज्जीद हमीद बेपारी याचे मालकीचे शेडमध्ये अब्दुल रहमान बापूसाहेब बेपारी, फारुख कुतुबुद्दीन बेपारी,बशीर कादिर बेपारी, नदीम आसलम बेपारी व मोहम्मद हारुण बेपारी सर्व रा. कुरेशी मोहल्ला कसाईवाडा, कराड यांना आपसांत संगणमताने बेकायदा बिगरपरवाना गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मांस विक्री व वाहतुक करीत असल्याची तसेच गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरपणे डांबुन ठेवल्याने ताब्यात घेण्यात आलेले असुन वाहतुकी करता वापरत असलेली दोन चारचाकी वाहने व एक तीन चाकी वाहन देखील जप्त करण्यात आलेली आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील, वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पतंग पाटील, अझरुददीन शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने, सहय्यक पोलीस फौजदार संतोष सपाटे, पोलीस हवलदार महेश लावंड, प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, पोलिस नाईक सागर बर्गे, दिपक कोळी. पो. हवा. वसीम संदे, शशी काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे पो.कॉ. दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, सागर भोसले, मपोकॉ सोनाली पिसाळ, आरसीपी प्लटुन सातारा यांनी सहभाग घेतला.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |