पाटण : धनगर एकजुटीचा विजय असो, यळकोट यळकोट जय मल्हारपेठ, एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्कांचं नाही कुणाच्या बापाचं, आरं कोण म्हणतंय देत न्हाय घेतल्याशिवाय राहत न्हाय, अशा घोषणा देत पाटण तालुका धनगर समाज बांधवांनी बाजाराच्या दिवशी सोमवारी कराड-चिपळूण राज्यमार्गावर ठिय्या मांडत रास्ता रोको केला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पाटण पोलिसांनी स्वत: आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात धनगर समाज वास्तव्यास आहे. या समाजातील मुले आता कुठे शिक्षण घेऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांना इतर समाजाप्रमाणे आरक्षण, शिष्यवृत्ती बरोबर विविध योजना, सोयीसुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा अट्टाहास आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत यापुढेही आमचा रास्ता रोको असाच सुरू राहील, असा इशाराही धनगर समाजाच्या वतीने आंदोलनकर्ते लक्ष्मण झोरे यांनी दिला आहे.
धनगर समाजाला आरक्षण बरोबरच इतर मागण्यांसाठी सोमवार, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता झेंडा चौक पाटण येथे कराड-चिपळूण राज्यमार्गावर पाटण तालुका धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको (चक्का जाम) आंदोलन करण्यात आले. वेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून घोषणाबाजी केली धनगर समाजाला गेली ७३ वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. केवळ एका अक्षरामुळे तो म्हणजे र आणि ड शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. शासनाने यात दुरुस्ती करावी. महाराष्ट्रातील गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या पाळणारे यांच्यावर सातत्याने होत असणारे अन्याय दूर करावे. राज्य सरकारने एक हजार कोटीची तरतूद केली आहे त्या तरतुदीची तातडीने अंमलबजावणी करावी.
तसेच धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करूनच मेगा भरती करावी, अशी मागणी याप्रसंगी बोलताना जानू झोरे व इतर आंदोलनकर्त्यांनी बोलताना केली. बऱ्याच वेळानंतर पाटण पोलिसांनी स्वत:हून आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाडळे यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |