08:47pm | Jun 18, 2023 |
सातारा : मोराच्या अंगावरची पिसे उपसून काढत त्याबाबतचा केलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत मध्य प्रदेश येथून प्रसार झालेल्या दोघांना सातारा वनविभागाने पाटण तालुक्यातील बेलवडे खुर्द या गावाजवळ अटक केली. अटकेतील त्या दोघांना मध्य प्रदेश येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील रिद्धी वनपरिक्षेत्रात राहणाऱ्या अतुल पूर्ण नाव माहित नाही याने वनक्षेत्रात एक मोर पकडला होता. या मोराची नंतरच्या काळात त्याने पिसे उपसून काढत त्याचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या ठिकाणच्या वन कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. वन कर्मचारी शोध घेत असतानाचे समजल्यावर अतुल हा युवतीसोबत तेथून पसार झाला होता. पसार झालेला अतुल सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती येथील वनविभागास मिळाली. त्यानुसार त्यांनी साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना या प्रकाराची कल्पना दिली. त्यानुसार त्यांनी तसेच सहाय्यक उपवनसंरक्षक महेश जंजुर्णे यांनी पाटणचे वनक्षेत्र पाल कर्मचारी फिरत्या पथकास सूचना देत संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यानुसार बेलवडे खुर्द गावाजवळ या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची माहिती मध्य प्रदेश वन विभागास देण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांना पाटण न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यप्रदेश वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |