म्हसवड : म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यात्रेच्या बंदोबस्तासाठी साताराहून आलेले पोलिस विकास सर्जेराव पवार वय 48 यांचे आज दि. २७ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने म्हसवड पोलिस ठाण्याच्या आवारात निधन झाले.
याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सवाचे बंदोबस्तासाठी सातारा येथील मोटार परिवहन विभागात नेमणुकीस असलेले व क्रेन नंबर MH 11AB 378 वरील चालक विकास सर्जेराव पवार (वय 48) बक्कल नंबर 527 हे सकाळी नऊ वाजणाच्या सुमारास पोलिस काॅन्स्टेबल विकास हणमंत जाधव यांचे बरोबर गप्पा मारत असताना पाणी व पित्ताची गोळी आणण्यास सांगितले त्यांना पाणी आणून दिले ते पाणी पिले असता त्यांना उलटी झाली. त्यांनी परत पाण्याची बाटली आणायला सांगितली पाण्याने तोंड धुतले आणि जमिनीवर बसले असता अचानक तोंडावर पडले म्हणून त्यांना म्हसवड येथील धन्वंतरी हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील डाॅक्टरनी तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले. या घटनेची म्हसवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सपोनि गणेश वाघमोडे करत आहेत.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |