सातारा : शिकारीच्या उद्देशाने जाळे (वाघर) लावून बसलेल्या दोघांना निगडी (ता.सातारा) येथील वनक्षेत्रात वनाधिका-यांनी अटक केली. न्यायालयाने दोन्ही संशयितांची एक दिवसाच्या वनकोठडीत रवानगी केली आहे.
सातारा तालुक्यातील निगडी वनक्षेत्रात शिका-यांनी शिकारीसाठी जाळे लावले असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वन कर्मचा-यांनी तात्काळ घटनस्थळी जाऊन सापळा लावला. त्यामध्ये सुनील साळुंखे व युवराज उर्फ विकास संपत पवार (दोघेही रा. निगडी) अलगद वनविभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून 2 वाघरी व कु-हाड असे शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. या पुर्वीही दोनवेळा याच पद्धतीने सशाची शिकार केल्याची कबूली संशयितांनी वनाधिका-यांकडे दिली.
ही कारवाई वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांनी वनरक्षक प्रशांतकुमार पडवळ, राजकुमार मोसलगी, मारुती माने, संजय धोंडवड, सुहास भोसले, रणजित काकडे व वसंत पवार यांनी केली. वन्यप्राणी शिकार प्रकरणात आरोपिंना पकडत असताना वनविभागाच्या कर्मचा-यांना अक्षरशः जिवावर उदार होऊन कामगिरी पारपाडावी लागते. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधनसामग्री अथवा स्वसंरक्षणासाठी काहीच हत्यार नसते. वरीष्ठ वनाधिका-यांनी याबाबतीत लक्ष घालून वनकर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी साहित्याचा पुरवठा करावा, अशी मागणी वनरक्षक वनपाल संघटना सातारचे कार्याध्यक्ष प्रशांतकुमार पडवळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |