वाई : महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नगरपालिका, नगरपरिषदा कोविड मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. मात्र वाई नगरपरिषद यासाठी शुल्क आकारत आहे. त्यामुळे वाई नगरपरिषदेने कोविड मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करावेत. अन्यथा वाई शहर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याबाबतचे निवेदन वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आज संपूर्ण जग एका विचित्र अवस्थेतून जात आहे. कोविड संकटाने जगाला घेरले आहे आणि आपण सगळेच या संकटाशी विविध प्रकारे लढतो आहोत.
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नगरपालिका, नगरपरिषदा या कोविडमुळे मृत झालेल्या नागरिकांवर मोफत अंत्यसंस्कार करत आहेत. यासाठी कोणतेही शुल्क न आकारता किंवा बळजबरी न करता हा खर्च पूर्णपणे नगरपालिका किंवा नगरपरिषद करत असताना वाई शहरात मात्र या उलट परिस्थिती आहे. वाई नगरपरिषद या सेवेसाठी तब्बल 7 हजार 200 रुपयांचे शुल्क आकारत आहे, शुल्क भरत नाहीत, तोवर अंत्यसंस्कार केले जात नाहीत.
मुळात कोणत्याही अंत्यविधीला एवढे पैसे लागत नाहीत आणि इतर गावात या संस्था हे काम मोफत करत असताना वाई नगरपरिषदच हे शुल्क का घेत आहे? गेली दोन वर्षे कोविड काळात कोणत्याही करांमध्ये कोणतीही सवलत नगरपरिषद देत नसताना परत हा भुर्दंड लोकांच्या माथी का मारला जात आहे? तरी तातडीने ही लूट थांबवून कोविड मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करण्यात यावेत. नाहीतर वाई शहर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे वाई शहर शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |