11:27am | Apr 25, 2024 |
सातारा : देगाव एमआयडीसीचे शिक्के उठवणाऱ्यांनी सातारकरांचे आधीच खूप नुकसान केले आहे. या बाहेरच्या लोकांनी येऊन सातारकरांना स्वाभिमान शिकविण्याची गरज नाही, असा प्रहार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
शेंद्रे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोनगाव येथील सप्तपदी कार्यालयात झाला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, माजी सभापती सुनील काटकर, अरविंद चव्हाण, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, विजय पोतेकर, संपतराव साळुंखे, सुरेंद्र देशपांडे, संजय पोतेकर, सूर्यकांत पडवळ, विश्वास नावडकर, प्रशांत पोतेकर, सुनील जाधव, संजय साळुंखे, अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, नामदेव नावडकर ,एडव्होकेट अंकुश जाधव, मोहनराव साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. खासदार उदयनराजे आणि माझ्यात कुठलेही राजकीय सेटिंग झालेलं नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा तालुक्यामध्ये जी विकास कामे झाली आहेत. तीच विकास कामे अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा भाजपला सत्तेवर आणायचे आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांनीच विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देगाव एमआयडीसीला खो घातला होता. सातारा तालुक्यात आपली स्वतंत्र ताकद आहे. आता विकासाच्या आड येणारे सातारकरांना स्वाभिमान शिकवत असतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. घटना बदलण्याबाबतचा चुकीचा प्रचार विरोधी नेत्यांकडून सुरू आहे वास्तविक मोदी शहा यांनी घटनेला हात लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मते मिळवण्यासाठी आंबेडकर प्रेमी जनतेला फसवण्याचे काम हे विरोधक करत आहेत, अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
हीच एकी कायम राहणार..
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा शहरासह तालुक्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली एकी पुढे विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच गाव पातळीवरील निवडणुकांत देखील कायम ठेवायची आहे, असे सुतोवाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात केले.
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |