09:41pm | Apr 25, 2024 |
सातारा : ठोसेघर, ता. सातारा येथील सुरेश विठ्ठल जाधव (वय ४३) यांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता ठोसेघर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश जाधव हे गवंडी काम करायचे. मात्र, ते एकटेच राहत होते. बुधवारी रात्री ते घरात झोपले होते. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला.
गुरुवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर पांगारे येथील पोलिस पाटील यांनी याची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक लोकांशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर हा खून एका अल्पवयीन मुलाने केला असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलाला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने वारंवार दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे हा खून केला असल्याची कबुली दिली.
सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक अरविंद काळे हे अधिक तपास करीत आहेत.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |

दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |