फलटण : फलटण पुर्व भागातील राजकीय वारसा व नावलौकिक असलेल्या राजुरी गावच्या नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून सहा महिन्याचा कारभार कोरोना काळात रडखडत सुरु आहे. निवडणुकीत ढिगभर आश्वासने दिलेले पुढारी आता मात्र छोटी-मोठी कामे करताना मेटाकुटीस आलेले दिसत आहेत.
राजुरी गावातून आळंदी-पंढरपूर हा पालखी महामार्ग गेल्याने गावास विशेष महत्त्व आहे. राजुरी चौफुला येथे मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. येथील व्यापार्यांकडे कोट्यवधीचा माल दुकानात असतो. किमती बाजारपेठेचे महत्त्व लक्षात घेता महिला सरपंच सौ. कौशल्या साळुंखे यांनी दोन वर्षापूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा व हायमास्ट पथदिवा बसवला होता. सीसीटिव्ही व हायमास्टपथदिवा दोन महिने झाले बंद अवस्थेत आहे. यासह येथील पथदिवेही महिनाभरापासून बंद आहेत. अशा अंधार्या रात्रीत येथील व्यापारी आपला माल रामभरोसे ठेवत आहेत. चोरी सारखा अनर्थ झाला तर त्यास जबाबदार कोण ?
परीसरातील नागरीकांनी वारंवार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना दुरुस्तीच्या सुचना देऊनही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना पावती करायला पंधरा दिवसातून एकदा येणारी ग्रामपंचायत नागरीकांच्या सुविधा कधी देणार ?
रोडलाईट, हायमास्टपथदिवा, सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहेच, यासह बसायची बाकडे शेजारील गावात आहेत, मात्र राजुरीत नाहीत. वाड्या-वस्तीवरील रस्ते खराब झाले आहेत. नवनिर्वाचित युवा, सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळींकडून जनतेला चांगल्या कामाच्या अपेक्षा आहेत.
राजुरी ग्रामपंचायत सध्या फलटण दूध संघाचे चेअरमन, रामराजे यांचे कट्टर समर्थक धनंजय पवार याच्या गटाकडे आहे. या श्रीराम वार्डावर गेली चाळीस वर्षे त्यांची सत्ता आहे. यावेळी कधी नव्हे एवढा फरकाने येथील वार्डाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी राजुरी ग्रामस्थांमधून होत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |