06:30pm | May 18, 2021 |
फलटण : सध्या सोशल मिडीयावर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आ. नीलेश लंके यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. यातच आज फलटणवरून आपल्या कोरोनाग्रस्त नातेवाईक रूग्णाला रुग्णाला घेऊन गेलेला युवक व आ. नीलेश लंके यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात युवक रडताना दिसत आहे. आ. नीलेश लंके त्यांना विचारत आहेत कुठून आला? यावर तो युवक म्हणतो, मी फलटण वरून आलो. त्यावर आ. नीलेश लंके म्हणतायेत, अरे रडतोय कशाला? मी आहे ना! आ. नीलेश लंके त्या युवकाला आपल्या जवळ घेऊ मिठीत घेत धीर देत आहेत. एवढेच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांना सांगताहेत की या युवकाच्या रुग्ण नातेवाइकाला जाऊन पाहुन या ते जेवलेत की नाही! पहा. हा व्हिडीओ आज फलटणमधील अनेक तरुणांनी, नागरिकांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसवर ठेवला आहे. तसेच आ. नीलेश लंके यांना धन्यवाद दिलेले आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. आ. नीलेश लंके यांचे कोरोना महामारीच्या काळातील कार्य कौतुकास्पद आहेच. पण हा युवक फलटण वरून कोरोनाग्रस्त आपल्या नातेवाईकाला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी घेऊन जातो. ही गोष्टच विचार करायला लावते.
फलटण-कोरेगाव तालुका हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आ. दीपकराव चव्हाण करत असून सध्या ते कोठे आहेत? या कोरोना काळात आ. नीलेश लंके यांच्यासारखे कार्य त्यांच्या हातून का उभे राहत नाही? असे प्रश्न सामान्य माणूस विचारताना दिसत आहे. वास्तविक पाहता अनुसूचित जातीतील अनेक लायक उमेदवार असतानाही त्यांना त्यांच्याच जातींमुळे ती संधी दिली गेलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागांवर आपल्या मर्जीतील लोकांची व तीही विशिष्ट जातीतीलच लोकांची वर्णी लागते. काही जाती या राजकारणातून बहिष्कृत केल्याचे विदारक परंतु वास्तववादी चित्र आहे. आज याच ठिकाणी स्वतंत्र विचाराचा फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची परंपरा मानणारा जर लोकप्रतिनिधी असता तर आ. नीलेश लंके यांच्यासारखे कार्य फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दिसून आले असते. कोणतेही व्हिजन व मिशन नसणारे आमदार सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आणले जातात, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांकडून मिळवून घेतलेल्या राखीव जागांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणण्याची गरज आहे. तर आणि तरच अनुसूचित जाती जमातीतील लायक आमदार आपल्याला निवडून आणता येतील. फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा मानणारा आमदार फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघात का चालत नाही? जातीअंताची लढाई आयुष्यभर लढणार्या महापुरुषांचा आदर्श आपण घेतोय का? उलट काही जातींच्या विषयी मनात पूर्वग्रह ठेवून आपण त्यांना राजकारणातून बहिष्कृत करत आहोत. आ. नीलेश लंके हे सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच आमदार आहेत व फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दीपकराव चव्हाण हे सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. जे काम आ. नीलेश लंके करु शकतात, ते दीपकराव चव्हाण का करु शकत नाहीत? याबाबत जनतेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि फलटणला आ. नीलेश लंके सारख्या कर्तबगार व्हिजन व मिशन असणार्या कृतिशील आमदारांची गरज आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |