07:42pm | Dec 29, 2022 |
सातारा : कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ चक्क प्रीतिसंगम उद्यानात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर उद्यानात सतरंज्या अंथरून प्रचार शुभारंभाची सभा देखील घेण्यात आली. प्रीतिसंगम उद्यानात राजकीय कार्यक्रमांना मनाई असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कराड नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण प्रेमींमध्ये तीव्र संताप आहे.
मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या कराड-पाटण शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे. गुरूजन एकता पॅनेलमध्ये शिक्षकांच्या दहा संघटना एकवटल्या आहेत. या पॅनेलने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर प्रीतिसंगम उद्यानातच सभा घेतली. वास्तविक उद्यानात राजकीय अथवा सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई आहे. ही बाब सर्वश्रुत आहे. तरीही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शिक्षकांनी आगळीक करून अडाणीपणाचे दर्शन घडवले. प्रीतिसंगमाचा राजकीय आखाडा केल्याने यशवंतप्रेमी संतप्त झाले असून शिक्षकांची प्रचार सभा वादात सापडली आहे.
शिक्षक सोसायटी निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाची सभा प्रीतिसंगम उद्यानात झाल्याची कराड नगरपालिका प्रशासनाला खबरच नाही. वास्तविक उद्यानात दिवस-रात्र नगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असतात. तरीही राजकीय सभा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्यानातील प्रचार सभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊनही नगरपालिका अनभिज्ञ होती.
या घटनेची माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईत होते. त्यामुळे उप मुख्याधिकारी पल्लवी पवार यांनी माहिती घ्यायला सुरूवात केली. हा प्रकार नगरपालिका प्रशासनाच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा घेणाऱ्या शिक्षकांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे कराडकर आणि यशवंतराव चव्हाण प्रेमींचे लक्ष लागून आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |