01:49pm | Jul 17, 2020 |
सातारा : काही महिन्यांपूर्वी फलटण तालुक्यामध्ये बोगस सैन्य भरती घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे फलटण तालुका पुणे पोलिसांसह सैन्य गुप्तचर दलाच्या रडारावर आला होता. असे असताना फलटण तालुक्यातील एका पठ्ठ्याने आरटीओ अधिकारी बनविण्याचे आमिष दाखवून एका युवकास चक्क सव्वा कोटींचा गंडा घातल्यामुळे फलटण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रमोद हरिश्चंद्र रणवरे (रा. मलटण, ता. फलटण) याने 2009 पासून झिरपवाडी, ता. फलटण येथील 35 वर्षीय महिलेला परिवहन अधिकारी बनविण्याचे स्वप्न दाखवून 2014 पर्यंत वेळोवेळी सुमारे सव्वा कोटी रुपये घेतले होते. तसेच त्याने बोगस पत्र पाठवून नियुक्तीपत्रेही संबंधित महिलेच्या घरच्या पत्त्यावर पाठवली होती. 2011 साली त्या महिलेला व तिच्या वडिलांना साहेबांना भेटायचे आहे, असे सांगून पिंपरी चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रमोद रणवरे घेवून गेला होता. मात्र तेथेही त्याने गंडवागंडवी करुन साहेब बाहेर गेले आहेत, आपण त्यांना नंतर भेटू असे सांगून त्यांना पुन्हा फलटणमध्ये घेवून आला होता. पैसे देवून पाच वर्षे उलटूनही नोकरी मिळत नसल्याने संबंधित महिलेने त्याला पैसे परत देण्याचा तगादा लावला होता. वारंवार पैशाची मागणी करुनही प्रमोद रणवरे प्रतिसाद देत नव्हता. शेवटी 16 मार्च 2014 रोजी प्रमोद रणवरेने पन्नास लाखाचा धनादेश संबंधित महिलेला दिला होता. परंतू तो धनादेश मी सांगेल तेव्हाच डिपॉझिट करा, असे त्याने सांगितले होते. शेवटी तो धनादेशही तुम्हाला रोख पैसे देतो, असे सांगून परत घेतला. रणवरेच्या अशा भूलथापांना कंटाळून संबंधित महिलेच्या वडिलांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला होता. रणवरेच्या सततच्या भूलथापांना व पैसे देण्यासाठी टाळाटाळीमुळे संबंधित महिलेने जानेवारी 2019 मध्ये रणवरेच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज दिला होता. त्यामुळे रणवरे हादरुन गेला. त्यानंतर प्रमोदने मी तुमचे पैसे देवून टाकतो, मला सहा महिन्यांची मुदत द्या असे सांगून धनादेश व नोटरी करुन दिली होती. त्यानंतर त्याने दिलेले धनादेशही वठले नाहीत. त्यामुळे 2009 ते 16 जुलै 2020 पर्यंत प्रमोद रणवरेने वेळोवेळी सुमारे सव्वा कोटी रुपये घेवून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणीची तक्रार झिरपवाडी, ता. फलटण येथील 35 वर्षीय महिलेने दिली आहे. याप्रकरणी प्रमोद रणवरे विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी सपोनि राऊळ अधिक तपास करीत आहेत.
नोकरीसाठी विकली 12 एकर शेती
झिरपवाडी, ता. फलटण येथील महिलेला एकाच ठिकाणी करीत असलेल्या कामाच्या ओळखीतून प्रमोद हरिश्चंद्र रणवरे याने पिंपरी चिंचवड येथील परिवहन कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेवून सव्वा कोटींची फसवणूक केली. प्रमोद रणवरेला पैसे देण्यासाठी संबंधित महिलेच्या वडिलांनी आपली 12 एकर शेती, फलटण येथील फ्लॅट तसेच खासगी फायनान्स कडून सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुमारे चार वर्षे हे पैसे सतत रणवरेला देत होते. परंतू या चार वर्षांमध्ये रणवरे खरेच काम करणार आहे, की तोतयागिरी करतोय? याची शहानिशा करण्याची गरज त्यांना का भासली नसावी? एकूणच फलटण तालुक्यात सैन्य भरती असो, शिक्षक भरती असो किंवा कालच उघडकीस आलेले प्रमोद रणवरेचे तोतयागिरी प्रकरण असो. एकूणच फलटण तालुका गंडवागंडवीसाठीचे कुरण झाले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |