08:46pm | May 26, 2023 |
सातारा : गुरुवार बागेच्या परिसरात सापडलेला 17 व्या शतकातील तो ऐतिहासिक रांजण उत्खनन करून बाहेर काढण्यात आला. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हा रांजण सुपूर्त करण्यात येऊन संबंधित परिसराचे संवर्धन कसे होईल याकरिता नगरपालिकेच्या सहकाऱ्याने स्वतंत्र आराखडा बनवण्यात येईल, असे आश्वासन माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व रवींद्र झूटिंग यांनी दिले आहे.
सातारा शहराच्या गुरुवार पेठेतील परिसरात असणारा गुरुवार बाग हा परिसर ऐतिहासिक ओळखला जातो. येथे 17 व्या शतकातील शाहू महाराजांनी बांधलेला तख्ताचा वाडा प्रसिद्ध होता. कालांतराने या वाड्याच्या साडेचार एकर जागेत अतिक्रमण झाले असून या वाड्याची सदर ऐतिहासिक विहीर इत्यादी काही अवशेष आता शिल्लक आहेत. या जागेवर आता गुरुवार बाग सध्या उभी आहे. या जागेत सातारा नगरपालिकेने समाज मंदिर बांधण्याचे नियोजित केले होते. येथील इतिहासप्रेमी कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार शुक्रवारी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, माजी नगरसेवक रवींद्र झूटिंग, जिल्हा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरबाज शेख, माजी नगरसेवक सागर पावशे, जिज्ञासा मंच निलेश पंडित तसेच शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे इत्यादींनी दुपारी तीनच्या नंतर उत्खनन मोहीम हाती घेतली. मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेला ऐतिहासिक रांजण तेथून मोकळा करण्यात आला. या रांजणाचा अभ्यास केला असता प्रवीण शिंदे म्हणाले हा रांजण 17 व्या शतकातील असून तो वैशिष्ट्यपूर्ण भाजणीचा आहे. यावर अजून सखोल संशोधन केले जाणार आहे.
हा रांजण संबंधित कार्यकर्त्यांनी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला. हा रांजण सध्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवला जाणार आहे. तख्ताचा वाडा परिसर हा ऐतिहासिक परिसर असून येथे अजून बरेच ऐतिहासिक अवशेष सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील खाजगी बांधकामांना परवानगी न देता विविध उत्खनन मोहिमांद्वारे येथील अवशेष शोधून ते पुरातत्त्व विभागाकडे जमा केले जाईल आणि या परिसराचे नगरपालिकेच्या सहकार्याने संवर्धन केले जाईल, अशी माहिती रवींद्र झूटिंग यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |