सातारा : सध्या कडक लॉकडाउन जारी असून बसस्थानकामध्ये पार्किंग केलेल्या मोकळ्या बसेसची तपासणी आज पोलिसांकडून करण्यात आली. गतवर्षी एका अल्पवयीन मुलाने बसस्थानकातील एका शिवशाही बसला आग लागली होती. या घटनेत सहा शिवशाही बसेस जळून खाक होऊन सुमारे चार कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज ही मोहीम राबवण्यात आली.
सातारा ही जिल्ह्याची राजधानी समजली जाते. याठिकाणी असलेल्या बसस्थानकातून जिल्ह्याच्या कानाकोपर्यासह ग्रामीण भाग, पर जिल्हे, मुंबई आणि इतर जिल्ह्यामध्ये बसेसची ये-जा सुरू असते. लालपरी म्हणून ओळख असणार्या बसेसमुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या संपुष्टात आली आहे. या सुविधेमुळे अनेकांना जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामांसह बाजारहाट करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. तब्बल एक वर्षानंतर पुन्हा एकदा सातार्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाउन जारी केला आहे. सर्वत्र कडक निर्बंध घातल्यामुळे बससेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो बसेसची चाके थांबली असून या बसेस सातारा बसस्थानकामध्ये पार्किंग करून ठेवण्यात आल्या आहेत.
गतवर्षी एका अल्पवयीन मुलाने बंद स्थितीत असलेल्या आणि बसस्थानकामध्ये पार्किंग केलेल्या एका शिवशाही बसला आग लावली होती. या घटनेत सहा शिवशाही बसेस जळून खाक होऊन ठेकेदाराचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तब्बल चार तास ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केल्यानंतर ही आज शमली होती. ही भीषण घटना लक्षात घेता सातारा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यांनी आज बसस्थानकातील सर्व बसेसची तपासणी केली. बसमध्ये कोणी बसले आहे का? बसेसचे कोणी नुकसान केले आहे का? या सर्व बाबी तपासून पाहिल्या. आज दुपारी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी आणि बसस्थानक पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुमारे दोन तास राबवण्यात आली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |