07:59pm | Jan 30, 2021 |
फलटण : येथील तहसिलदार कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारत कॉम्प्युटर, प्रिंटर तसेच इतर साहित्य मिळून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला असून चोरट्यांनी थेट फलटण तहसिलदारांच्या कार्यालयातच हाथ की सफाई केल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फलटण तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यातील नोटीसबोर्डवर ठेवलेल्या चावीने कार्यालयाचा दरवाजा उघडून कार्यालयातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, कि-बोर्ड, माऊस, केबल व राऊटर असे मिळून सुमारे दोन लाख 700 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. त्यानुसार निवासी नायब तहसिलदार रमेश चिंतामणी पाटील (वय 40, रा. जाधववाडी, फलटण) यांनी याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे सपोनि गायकवाड करीत आहेत.
चोरी नक्की कशासाठी?
फलटण तहसील कार्यालयात चोरी झाल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चक्क तहसिलदारांच्याच कॉलरला हात घातल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नोटीस बोर्डावर ठेवलेल्या चावीने कार्यालय उघडून मुद्देमाल लंपास केल्यामुळे चोर नक्कीच माहितगार असावा? एकतर त्याने हे कृत्य पैशासाठी केले की कॉम्प्युटरमधील डेटासाठी? हे मात्र पोलीस तपासातच निष्पन्न होणार आहे. तहसिल कार्यालयासारख्या गोपनीय कामे चालत असलेल्या कार्यालयाची चावी व्हरांड्यातील नोटीसबोर्डवर जाणीवपूर्वक ठेवली, की अजाणतेपणाने? याचा शोधही पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |