12:53pm | Sep 06, 2020 |
पुसेगाव: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने विविध मागण्यां साठी आज शिक्षक दिन असतानाही काळ्या फिती लावून काम करत शासनाच्या विरोधात निषेध नोंदवला असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.एन.टी. निकम यांनी दिली.
महासंघाच्या मागण्या मान्य व्हाव्यात. यासाठी यावर्षी शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षक दिनी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी संबंधित तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना कोरोनाचे सर्व नियम पाळून पदाधिकारी व अन्य सभासद शिक्षक यांनी जिल्हाभर निवेदने दिली.
तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या दिलेल्या निवेदनानुसार मूल्यांकन पात्र घोषित व अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाना वेतन अनुदान देणे, सन 2002 -03 पासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे, आय.टी.आय. शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन द्यावे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच शासकीय कर्मचार्यांना 10,20,30 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना राज्य महासंघाने विविध प्रलंबित मागण्यांचे पत्रे देऊन राज्य महासंघाला न बोलवता शासनाने बैठक घेऊन मागण्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सरकार मोठ्या प्रमाणात शिक्षक सभासद असलेल्या महासंघाला चर्चेसाठी डावलत आहेत, आणि असा प्रकार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व त्यांचा राज्य महासंघ कदापिही सहन करून घेणार नाही. याबाबत आज शिक्षक दिन असतानाही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा निषेध करून यंदाचा शिक्षक दिन आज राज्यासह, जिल्हाभर काळा दिन म्हणून साजरा करण्यात आला असल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा.आर.एस. शिंदे व कार्याध्यक्ष प्रा. विलास खंडाईत यांनी सांगितले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |