10:44pm | Jul 10, 2020 |
सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 16 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे, तर सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 12 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसेच जिल्ह्यातील 3 बाधितांचा मृत्यू झाल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आज निष्पन्न झालेल्या बाधितांमध्ये वाई तालुक्यातील परखंदी येथील 60 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडी येथील 75 व 27 वर्षीय महिला, ओंकार गार्डन जेजुरीकर कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष, परसणी येथील 85 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील सरडे येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील गोकूळनगर येथील 15 वर्षीय तरुणी, मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, बांबोडे येथील 21 वर्षीय तरुणी, कोयनानगर येथील 85 व 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील 39 वर्षीय महिला व 30, 60 वर्षीय पुरुष, कवठे येथील 28 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष.
माण तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 26 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालिका व 50, 27 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, येलगाव येथील 28 वर्षीय महिला, विद्यानगर सैदापूर येथील 26 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
3 बाधितांचा मृत्यू
कृष्णा हॉस्पिटल कराड येथे पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील लटकेवाडी, सावडे येथील 52 वर्षीय पुरुष, या दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील 62 वर्षीय पुरुष याचा दि. 8 जुलै रोजी मृत्यू झाला असून त्याचा दि. 7 जुलै रोजी शिरवळ येथे घेण्यात आलेला नमुना पॉझीटिव्ह असल्याचे पुणे प्रयोगशाळेने कळविले आहे. उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना लोणंद येथे त्याचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले आहे.
561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 42, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 77, फलटण येथील 43,कोरेगांव येथील 37, वाई येथील 42, शिरवळ येथील 164, रायगाव येथील 17, पानमळेवाडी येथील 10, मायणी येथील 13, दहिवडी येथील 56, खावली येथील 24, तळमावले येथील 18 असे एकूण 561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून हे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |