06:00pm | Mar 11, 2022 |
पाटण : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष स्व. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले कार्य सांगण्याएवढा मी मोठा नाही. स्व.लोकनेते यांचे कार्य अवघा महाराष्ट्र जाणून आहे. त्यांनी राज्याचे विविध खात्याचे मंत्री म्हणून केलेले कार्य अजरामर असल्याचे प्रतिपादन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाच्या ‘महाराष्ट्र दौलत’ सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या 112 व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, व्हा. चेअरमन राजाराम पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, जि.प. व पं.स. सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
यशराज देसाई म्हणाले, दुरदृष्टी लाभलेले नेते स्व.साहेबांच्या रुपाने आपल्या मतदारसंघालाच नव्हे; तर संपुर्ण राज्याला लाभले, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. डोंगरी आणि दुर्गम भागात वसलेल्या पाटण तालुक्याला देशाच्या नकाशावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आपल्या मतदारसंघात लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे कार्य राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई साहेब करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेतेसाहेब, स्व. आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या विविध संस्था नावारुपास आणण्याचे कार्य या संस्थामधील पदाधिकारी, विश्वस्तांनी करावे. हीच खरी लोकनेतेसाहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रध्दाजंली ठरणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी यशराज देसाई, रविराज देसाई यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. दरम्यान, रविराज देसाई यांनीही मनोगते व्यक्त केले. स्वागत अशोकराव पाटील यांनी केले. पांडूरंग नलवडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सह. उद्योग समुहातील सर्व संस्थाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे लवकरच विस्तारीकरण
आपला कारखाना ग्रामीण, डोंगरी भागात असला; तरी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर कारखान्याच्या बरोबरीने आपणही स्पर्धेत उतरण्याकरिता कारखान्याचे विस्तारीकरण करणार आहोत. ना. साहेबांच्या संमतीने लोकनेतेसाहेब यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त कारखान्याच्या विस्तारीकरणाची घोषणा करताना अत्यानंद होत असल्याचेही यशराज देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |