पुसेगाव: औंध-पुसेगाव या राज्यमार्गामुळे जाखणगाव (ता.खटाव) येथील एस.टी.स्टँड चौक परिसरात वाहनांच्या वर्दळीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. भरधाव जाणार्या वाहनांमुळे हा स्पॉट धोकादायक ठरू लागला आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे अलिकडच्या काळात अपघाताचे प्रमाण वाढले आसल्याने वरचेवर घडणार्या या दुर्घटना स्थानिकांची डोकेदुखी बनत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज आहे.
राज्य शासनाच्या ड्रीम प्रोजेक्टमधील एक असलेला औंध- पुसेगाव राज्यमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या वेगाने लोकवस्ती, विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय वाढू लागल्याने हा परिसर सकाळपासूनच गजबजलेला आसतो. शिवाय या मार्गाच्या दोन्ही बाजूल प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. जाखणगावच्या पश्चिमेला छोटी-मोठी अशी चार गावे व वाड्या वसलेल्या आहेत.
पुसेगावच्या बाजूने तीव्र उतार आहे. नविन वाहन चालकांना या ठिकाणाची माहिती नसल्याने पुर्व, पश्चिमेकडून येणार्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वेगात येणार्या वाहनांमुळे या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात यापूर्वी घडले असूनही संबधित विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे.
या राज्यमार्गाचे नव्याने डांबरीकरण झाल्याने अनेक दुचाकीस्वारांसहित इतर वाहनचालकही वाहने सुसाट वेगाने चालवत आसतात. त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते.
या रस्त्याने वाहनांची रहदारी वाढली आहे. शिवाय शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे संबधित विभागाने वाढत चाललेल्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी गतिरोधक, चारही बाजूंना चालकांना दिसतील अशा पध्दतीने सुचना फलक या सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याची गरज आहे.
- सारीका सोमनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्या
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |