बुध: खटाव तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार महेश शिंदे गटाचे सुरेश रामचंद्र चव्हाण तर उपसरपंचपदी वैभव दत्तात्रय सुतार यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री काशीविश्वेश्वर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
नेर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत प्रकाश चव्हाण, रुपेश चव्हाण यांच्या श्री काशीविश्वेश्वर महाविकास आघाडीने 9 पैकी 6 जागा मिळवत सत्तांतर केले होते. तर संजय चव्हाण यांच्या साई दुर्गा पॅनेलला 3 जागांवर समाधान मानावे लागले होते.
नेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता. 27) दुपारी सरपंचपदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंचपदासाठी सुरेश चव्हाण तर उपसरपंच पदासाठी वैभव सुतार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी आर.एस.जगताप यांनी जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी एस. आर. सणस यांनी निवड प्रक्रिया उत्तम प्रकारे हाताळली. यावेळी हेमलता गिरी, सुधाताई चव्हाण, संजीवनी चव्हाण, समीर चव्हाण हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मिलिंद चव्हाण, प्रकाश चव्हाण, पंकज चव्हाण, विश्वास चव्हाण, सुनील चव्हाण, भरत चव्हाण, उत्तम चव्हाण, चंद्रकांत भोसले, हणमंत चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान नवनिर्वाचितांचे आमदार महेश शिंदे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीरशेठ जाधव, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे यांनी अभिनंदन केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |