05:21pm | May 25, 2020 |
सातारा : सातारा तालुक्यात सर्वात महसुली ग्रामपंचायत अशी ओळख असणार्या खेड, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीने खेड येथे आओ कोरोना... आओ कोरोना अशी परिस्थिती निर्माण केली आहे. प्रभागांमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या फवारणीमध्ये सातत्याच्या अभावासह भाजी मंडईत सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला आहे. सर्वच प्रभागांमध्ये संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली असताना गावचे प्रथम नागरिक सरपंच विजय शिंदे अज्ञातवासात गेले आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप भाजपा विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल लोखंडे यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना केला.
22 मार्च रोजी सातारा जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. या सूचनांवर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सहाही प्रभागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप करून स्वप्निल लोखंडे पुढे म्हणाले, काही प्रभागांमध्येच हायड्रोजन पॅरासाईडची फवारणी केली जात आहे तर काही प्रभागांना मात्र यामधून वगळून सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. वनवासवाडी येथील प्रभागामध्ये तर आत्तापर्यंत झालेल्या तीन लॉक डाउनमध्ये केवळ दोन वेळा औषध फवारणी करण्यात आली आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनेक किराणामालाची दुकाने, दवाखाने, मेडिकल, विविध प्रकारचे शॉप, गॅरेज, मोठमोठी हॉस्पिटल्स, कपड्याची-भांड्याची दुकाने, मंदिरे, पान शॉप आदींची मोठी संख्या आहे. अशा ठिकाणी सातत्याने औषध फवारणी करणे गरजेचे आहे. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप करून पुढे असे म्हटले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणावर भर देणे गरजेचे आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून तेही काम केले जात नाही. विविध प्रभागांमध्ये रस्त्यांवर पडलेला कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगम नगर येथे मोठ्या प्रमाणावर भाजी मंडई भरली जाते. या भाजी मंडईमध्ये विक्रेते सोशल डिस्टन्सचा अजिबात वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. तरी ग्रामपंचायत मात्र ही बाब गांभीर्याने घेत नाही याबाबत आश्चर्य वाटते असे सांगून लोखंडे पुढे म्हणाले, ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेकजण मास्कचा वापर न करताच मोठ्या प्रमाणावर वावरताना आढळून येत आहेत. कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजना, जनजागृती, प्रबोधन करण्यासाठी ग्रामपंचायतीचा एकही पदाधिकारी पुढाकार घेत नाही, ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सरपंच विजय शिंदे हे तर अज्ञातवासात निघून गेले आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कुठे आहे कोरोना सुरक्षा समिती ?
सातारा जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोना सुरक्षा समिती स्थापन केली असल्याचे वृत्त आहे. ही समिती गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबरोबरच गावामध्ये नवीन कोण येते, तसेच गावात निर्माण झालेल्या समस्यांवर ऊहापोह केला जातो. खेडमध्ये अशा समितीची स्थापना झाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करून समिती स्थापन झाली असल्यास ती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदस्य ठेकेदारांचा टक्केवारीवर भर
खेड ग्रामपंचायतीमध्ये अनेक सदस्य हे ठेकेदार असून ते विविध प्रभागातील विकासकामांची टेंडर भरत असतात. काही ठेकेदार स्वतः काम करतात. तर काहीजण हीच कामे दुसर्याला देऊन त्याच्या बदल्यात भरपूर टक्केवारी उकळतात, याकडेही लोखंडे यांनी लक्ष वेधले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |