04:12pm | Jun 30, 2022 |
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही यावर भाष्य केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोखठोक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही, असे दिलेल्या राजीनाम्यावरून दिसल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला दिले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीच्या बाजूने निकाल दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यावर बोलताना, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. बरीच अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकांवर सुनावणी करु सांगू आणि आता आपलाच निर्णय बदलला. त्यांनी विचित्र निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ही अपेक्षा नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती
उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसेच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केले हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आले असते. एक-दोन तास सभागृह चालले असते आणि नंतर निर्णय घेतला असता तर चालले असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही
आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही. रक्तपात होईल वैगेरे असे जे काही ते म्हणाले ते खोटे होते. त्यांनी लढायला हवे होते. ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष पाठिंबा दिला त्यांना सांगायला हवे होते. फेसबुक लाइव्ह आणि विधिमंडळात बोलणे यात फरक आहे. विधीमंडळात जे बोलतो ते रेकॉर्डवर राहते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे
इतक्या मोठ्या प्रमाणात माणसे नाराज आहेत. याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्या धक्क्यातून ते बाहेरच आले नाहीत. माझ्या इतक्या माणसांनी दगा दिला असे ते सारखे म्हणत राहिले. खाली काय सुरु होते याचा त्यांना अंदाज आला नाही. हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे. भाजपाला थांबवण्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय दिला असता तर आम्ही मान्य केला असता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर राग काढला तोही काही खरा नव्हता. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले तसेच यावेळी घडेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवारांनी दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्याने कनिष्ठ व्यक्तीच्या हाताखाली काम करणे अवघड जाईल अशी भूमिका घेतली होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |