पुसेगाव : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या विद्युत संशोधन विधेयक २०२० अन्यये वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाचा तसेच महावितरण प्रशासनाने ९१ उपकेंद्रात बाह्यस्त्रोत यंत्रचालक पदांना दिलेल्या पदांच्या मंजुरीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटना सोमवार दिनांक १ जून २०२० रोजी काळ्या फिती लावून काम करून निषेध नोंदवणार असल्याचे या संघटनेचे कार्याध्यक्ष सुधीर इंगळे यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या खाजगीकरण धार्जिण्या, कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ एक दिवस काळ्या फिती लावून ही संघटना काम करणार असल्याचे नमुद करुन श्री. इंगळे यांनी सांगितले, या कायद्यान्यये वीज क्षेत्र हे खाजगी भांडवलदारांना खुले होणार असून शासकीय कंपन्यांचे अस्तित्व नष्ट होणार आहे. घरगुती, शेती, पाणीपुरवठा, दिवाबत्ती ग्राहकांना मिळणारी क्रॉस सबसिडी रद्द होणार असून ग्राहकांना मिळणारा क्राँस सबसिडी लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे. त्यामुळे शेती, घरगुती कमी वीज वापर करणारे ग्राहक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सध्या मिळत असलेला लाभ भविष्यात मिळणार नाही व वाढीव दराने वीज खरेदी करावी लागेल याची शक्यता नाकारता येत नाही. कामगार हितासाठी निर्माण झालेले विविध कायदे रद्द करण्याचे केंद्र सरकारचे धोरण असून त्याची अंमलबजावणी बहुतेक राज्यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांनी तीन वर्षांकरिता कामगार कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा निषेधही ऑपरेटर्स संघटना विरोध करीत आहे.त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१९ पासून नव्याने निर्माण झालेली ९१ उपकेंद्रे ही कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांकडून संचलन न करता ठेकेदारांमार्फत संचलन करण्याचा महावितरण प्रशासनाने निर्णय घेतला असून त्याला विरोध व निषेध म्हणूनही हे आंदोलन संघटनेच्यावतीने करण्यात येणार असल्याचे श्री. इंगळे यांनी नमुद केले.१ जून रोजी सर्व यंत्रचालक पदाधिकारी सभासद यांनी काळ्या फिती लावून कामकाज करावे व या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |