02:00pm | Sep 24, 2022 |
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दिल्लीतील मशीद भेटीवरून काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, अशी म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच भागवत यांची इमामांसोबतची भेट दाखवण्यापूर्ती होती, अशी टीका सिंह यांनी केली आहे.
याविषयी बोलताना दिग्विजय सिंग यांनी,"जोपर्यंत मोहन भागवत मॉब लिंचिंगचा बळी ठरलेल्या अखलाखच्या कुटुंबीयांची भेट घेत नाहीत आणि बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्यांच्या सत्काराविरोधात बोलत नाहीत, तोपर्यंत भागवत यांनी इमामांची घेतलेली भेट ढोंग आहे" असे देखील त्यांनी म्हटले आहे. "निरपराध मुस्लिमांच्या छळाबाबत तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची माफी मागितल्यास, त्यांना न्याय मिळवून दिल्यास आम्ही आरएसएस वेगळा विचार करत आहे यावर विश्वास ठेवू", असे सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ही भेट 'भारत जोडो' यात्रेचा प्रभाव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी २२ सप्टेंबरला दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी 'ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन'चे प्रमुख उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर इलयासी यांनी मोहन भागवतांचा 'राष्ट्रपिता' म्हणून उल्लेख केला होता. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |