कराड : आज एमबीए या व्यवस्थापन क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्यवस्थापन क्षेत्रात आपले करिअर करताना दिसत आहेत. नवीन शैक्षणिक २०२२ साठी ७ एप्रिल ही व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या शासकीय प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे. या कालावधीत जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृष्णा फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
पदवी परीक्षेत बसलेले व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात. कोरोनाची परिस्थिती सुरळीत होत असताना सीईटी परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला गती प्राप्त होऊ लागली आहे. एमबीए सीईटी २०२२ परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार या पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा मोठा कल दिसून येत आहे. शिवाजी विघापीठाने गेल्या काही वर्षात एमबीए अभ्यासक्रमात केलेले नावीन्यपूर्ण बदल पाहता विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातील एमबीए या अभ्यासक्रमाला मोठी पसंती दर्शवली आहे.
भविष्यामध्ये कुशल मनुष्यबळाची निर्मिती आणि विकास व्हावा, यासाठी उपयुक्त असा अभ्यासक्रम तयार केला आहे. तर मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, फायनान्स, प्रोडक्शन, सिस्टीम, ॲग्री बिजनेस, इंटरनॅशनल बिझनेस, आंत्र्यप्रुनरशिप, हॉस्पिटॅलिटी, टेक्स्टाईल, बिझनेस अनॅलिस्ट यापैकी कोणतेही दोन विषय घेवून विद्यार्थी एमबीए करू शकतात.
एमबीएला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देणे गरजेचे असते. प्रवेश परीक्षा दिली; तरच शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतीसाठी विद्यार्थी पात्र ठरतात. तसेच विद्यार्थ्यांना फी’मध्ये सवलत मिळते. एमबीए या व्यवस्थापन अभ्यासक्रमात महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या कराडच्या कृष्णा फौंडेशनमध्ये एमबीए या अभ्यासक्रमाच्या नाव नोंदणीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या नाव नोंदणीसाठी कृष्णा फौंडेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |