09:51pm | Sep 13, 2021 |
सातारा : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलंय. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला असून आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली आहे. या घटनेला सरकारच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
खासदार उदयनराजे म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या साकीनाका परिसरातील घडलेल्या घटनेत क्रुरता-विकृती-वासनेला बळी पडलेल्या महिलेची जगण्याची झुंज अयशस्वी ठरली. काळीमा फासणारी ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. या घटनेचा दुःख, खेदही वाटतोच. परंतु, त्याही पेक्षा मनस्वी संताप येतोय. राज्यातील आणि देशातील स्त्री असुरक्षित असेल, तर आपण विकासाच्या गप्पा कोणत्या धारणेवर करतो, हा प्रश्न पडलाय.
स्त्री दाक्षिण्य मानणार्या माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले आहे. या व अशा बलात्कारांच्या घटनेला सरकार जबाबदार आहेच, परंतु सर्व समाज आणि मानवजात देखील जबाबदार आहे. कायदा आंधळा आहे. परंतु, तो नेहमीच न्यायिक निवाडा करतो. मात्र, जरब बसेल अशा शिक्षांची तरतूद आयपीसी-1860 मध्ये करावी लागेल. तसेच राज्याने बलात्काराच्या बाबतीत कायदेतज्ञांशी विचारविमर्श करुन, वेगळी दंड निती/संहिता अस्तित्वात आणावी, अशी त्यांनी मागणी केली. या घटनेची शहानिशा तातडीने करुन, क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षाच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |