10:02pm | May 15, 2020 |
कोरेगाव : जांब बुद्रुक, ता. कोरेगाव येथे एका इमारतीच्या बांधकामावर काम करत असलेल्या मुकादमाने पैसे न दिल्याने चिडून जाऊन दोन मजुरांनी त्याच्या छातीवर आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. जळगाव येथे माळ नावाच्या शिवारात ही घटना घडली असून, खून झालेल्या मुकादमाचे नाव राजू पवार, रा. अमरावती असे आहे तर खून करणार्या मजुरांची नावे नागेश रामचंद्र बंजत्री, रा. चिंचोळी, ता. मुद्दे बिहाळ, जि. विजापूर (कर्नाटक) व किरण बाबुराव पाटील, रा. उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर अशी आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यातून आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, की राजू पवार हा बांधकामावरील मुकादम असून, त्याच्या हाताखाली नागेश व किरण हे दोघे काम करतात. हे सर्वजण भीमनगर, ता. कोरेगाव येथे भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास आहेत. जांब बुद्रुक येथे सुरु असलेल्या एका इमारतीच्या कामावर तिघे जण काम करत होते. गुरुवारी त्यांच्यामध्ये पैशांवरुन वादावादी सुरु होती. काम संपल्यानंतर तिघे जण जांब बुद्रुक ते जळगाव या डांबरी रस्त्याने पायी चालले होते. रस्त्यात पुन्हा पैशांवरुन वाद झाला. त्याचवेळी नागेश व किरण याने रस्त्यावर वाद नको, बाजूला जाऊ म्हणत राजू याला लगतच्या शेतातील ओघळीकडे नेले. तेथे भांडणे झाल्यानंतर दोघांनी राजू याला खाली पाडले. नागेश याने रागाच्या भरात तेथे पडलेला सुमारे २५ ते ३० किलो वजनाचा मोठा दगड घेतला आणि राजूच्या छातीवर मारला, त्यात तो गतप्राण झाला. त्यानंतर किरण याने तोच दगड घेतला आणि राजूच्या तोंडावर आणि डोक्यात मारला. त्यात त्याचा मृत्यु झाला.
दोघांनी राजू पवार याचा मृतदेह तेथेच टाकला आणि जांब बुद्रुक गावच्या दिशेने निघून गेले. रात्रभर ते एका ऊसाच्या शेतात लपून बसले होते. जळगाव येथील शेतकरी सकाळच्या सुमारास शेताकडे आल्यानंतर त्यांना रस्त्याकडेच्या ओघळीत डोक्यात दगड घातलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी जळगावच्या पोलीस पाटील विश्वनाथ काशिनाथ पवार यांना माहिती दिल्यानंतर कोरेगावचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व सातारारोड पोलीस दूरक्षेत्रचे सपोनि संतोष साळुंखे हे फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व वडूजचे पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी भेट दिली.
जळगावमध्ये खून झाल्याची माहिती पसरताच जळगावसह जांब बुद्रुक येथील ग्रामस्थ व शेतकर्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यातील काही जणांनी जांब बुद्रुक येथील एका ठेकेदाराकडे तिघे जण काम करत असल्याचे व खून झालेल्या व्यक्तीचे नाव राजू पवार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नागेश रामचंद्र बंजत्री, रा. चिंचोळी, ता. मुद्दे बिहाळ, जि. विजापूर (कर्नाटक) व किरण बाबुराव पाटील, रा. उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना जांब बुद्रुक येथून अटक केली. याप्रकरणी जळगावचे पोलीस पाटील विश्वनाथ पवार यांनी तक्रार दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि संतोष साळुंखे तपास करत आहेत.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |