सातारा : येथील एमआयडीसी परिसरात एका कंपनीसमोर एका महिलेस तिचा पती कोठे आहे अशी विचारणा करत त्याला बोलव आणि लगेच दोन लाख रुपये दे म्हणत तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या दोन महिलांसह तिचा विनयभंग केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार पिडीत महिला दि. १५ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास नवीन एमआयडीसीतील एका कंपनीसमोर उभी असताना सुनिता जाधव, तिची बहीण पूनम (पूर्ण नाव माहिती नाही) आणि सुनिताचा भाऊ मारुती (पूर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. काळोशी, कोडोली, सातारा मूळ रा. एकसळ, ता. कोरेगाव हे तिथे आले.
त्यांनी तक्रारदार महिलेला तिचा पती कोठेही अशी विचारणा केल्यावर ते कामाला गेले असल्याचे तिने सांगितले. त्यावर त्याला आता बोलावून घे नाहीतर मला दोन लाख रुपये दे, अन्यथा तुझे शॉप जाळून टाकीन अशी धमकी दिली. त्यावर महिलेने पती बाहेर गेले असून तुम्ही असे काही करु नका असे सांगितले. त्यावर सुनिता, पूनम यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली व दगड व काठीने मारहाण केली.
यावेळी झालेल्या झटपटीत महिलेचे मंगळसुत्र तुटले ते परत मागितले असते सुनिता हिने मारुती याच्याबरोबर रिलेशनशिप ठेव असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर तक्रारदार महिलेने रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल करत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |