02:18pm | Mar 24, 2021 |
पुसेगाव: कृषि उत्पादन वाढीमध्ये मृदा ही अत्यंत महत्वाची असून तिचे आरोग्य वाढविणे गरजेचे आहे. जमिनीची सुपिकता व उत्पादकता या एका नाण्याच्या दोन बाजू असून, जमिनीची आरोग्य पत्रिका अभियानामध्ये सर्वानी सहभागी होउन मृदा परिक्षण करणे अत्यंत महत्वाचे असलेचे प्रतिपादन कृषि पर्यवेक्षक सुनिल यादव यांनी पवारवाडी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिनीची आरोग्य पत्रिका अभियान, तालुका कृषि अधिकारी राहूल जितकर व मंडळ कृषि अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनानुसार खटाव तालुक्यात सु डिग्री आहे. यावेळी मार्गदर्शन करताना सुनिल यादव म्हणाले की, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातर्गत जमिनीची आरोग्य पत्रिका तपासणी व त्याच्या आधारे पिक निहाय खत मात्रा वापरणे अत्यंत गरजेचे आहे. जमिनीची सुपिकता वाढविणेसाठी कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंड यांचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे.
याप्रसंगी सचिन लोंढे यांनी उन्हाळी भुईमूग या पिकाविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. तर कृषि पर्यवेक्षक मुकूंद म्हेत्रे यांनी गांडूळ व कंपोस्ट खत तयार करण्याची शास्त्रीय पध्दती, तसेच जैविक किटकनाशके का वापरणे गरजेचे आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि पर्यवेक्षक नामदेव कोळेकर यांनी आले पिकातील लागणी विषयी तर कृषि सहायक सुर्यकांत भोईटे यांनी काढणी पश्चात तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
जमिनी आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत पवारवाडी येथील प्रत्येक शेतकर्याच्या गटातील मृद नमुना काढून तपासणी केली जाणार आहे. तरी गावातील प्प्रत्येक शेतकर्याने मृद नमुना काढावा, असे आवाहन कृषि सहायक हरिदास भोसले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सरपंच महेश पवार, माजी सरपंच रमेश जाधव, पोलीस पाटील विकास जाधव, संतोष पवार व संतोष कदम यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कृषि विभागाचे उषाताई चवरे, शंकर जगदाळे व ग्रामसेविका साळुंखे उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |