09:10pm | Sep 25, 2022 |
सातारा : भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम असणाऱ्या नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली असून आदिशक्तीच्या स्वागताची तयारी सातारा शहरांमध्ये पूर्ण झाली आहे. सातारा शहरातील सुमारे 90 हून अधिक सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी जाणवत असून उपवासाच्या साहित्य खरेदीसाठी सुद्धा वर्दळ आहे.
याशिवाय गरबा- दांडिया इत्यादींच्या खरेदीसाठी आणि नवरंगाच्या विशेष आकर्षणातून कापड मार्केटमध्ये सुद्धा उलाढाल वाढल्याने व्यापारी वर्ग प्रचंड व्यस्त आहे. देवी आदिशक्तीच्या जागराचे नऊ दिवस हे उत्साहाने आणि मांगल्याने भरलेले असतात. पितृपंधरवड्यानंतर येणाऱ्या या सणाचे धार्मिक महात्म्य मोठे आहे. मांगल्याचे प्रतिक असलेल्या नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत असून गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हा सण म्हणावा इतका उत्साहाने साजरा झाला नव्हता. घटस्थापनेसाठी सातारा शहर परिसरातील गोलबागेजवळ घटाची माती, घट, नाडापुडी इतर साहित्य खरेदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे यंदा नवरात्र उत्सवाचा उत्साही माहोल मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
घरगुती आणि सार्वजनिक उत्सवाच्या अंतिम टप्प्यात आले असून देवींच्या उपासनांची पूर्वतयारी करण्यासाठी महिला वर्गाची धांदल उडाली आहे. सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांनी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आणली आहे. कुंभारवाड्यामध्ये देवीला पारंपारिक पद्धतीने नेण्यासाठी गडकर आळी, कुंभार आळी येथे गर्दी सुरू झाली आहे. नऊ दिवस दुर्गामातेची नवरुपांमध्ये पूजा बांधली जाते. देवीला साडी-चोळी, ओटी, खण-नारळ, रांगोळी, वस्त्र पूजा इत्यादी साहित्य आवश्यक असते. त्या साहित्य खरेदीसाठी गडबड वाढली आहे.
नऊ दिवसाचा रास गरबा, दांडिया इत्यादीच्या खेळासाठी वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या बांधणीच्या साड्या हव्या असल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर कापड मार्केटमध्ये गर्दी करत आहे. घटस्थापनेसाठी मातीचे कलश, मिश्र धान्य, नाडापुडी साहित्य विक्रीची दुकाने शहरात ठिकठिकाणी दिसत आहेत. नवरात्र संवाद नवरंगाचे महिला वर्गामध्ये विशेष आकर्षण आहे. नऊ दिवस नऊ रंगांच्या साडया या दिवशी परिधान केल्या जातात. त्यामुळे कापड मार्केट सज्ज झाले आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी नवरंगातील साड्या, ड्रेस खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. नऊ दिवस महिलांचे उपवास असल्याने खजूर, भाजणीचे पीठ, साबुदाणा, शेंगदाणे याशिवाय ड्रायफ्रूट इत्यादी फराळाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नायलॉन चिवडा, वरई, वेफर्स, रेडिमेड पीठे इत्यादी साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. मात्र यंदा जीवनावश्यक आणि खाद्यपदार्थांच्या वस्तूवर मोठ्या प्रमाणावर जीएसटी ची सक्ती असल्याने सातारकरांचा खिसा थोडा जास्त हलका होणार आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |