12:22pm | Jul 11, 2020 |
मुंबई: कोरोना विरोधात सुरू असलेला धारावीचा लढा यशस्वी होताना दिसत आहे. मुंबईतील मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या प्रयत्नांची दखल घेत धारावीतील लढ्याचे कौतुक केले आहे. ‘कोविड 19’ थोपवला जाऊ शकतो हे धारावीनं दाखवून दिलं आहे,’ असं डब्ल्यूएचओ ने म्हटलं आहे.
‘मुंबईतील एक अत्यंत दाटीचा परिसर असलेल्या धारावीत प्रशासनानं अत्यंत नियोजनबद्ध काम केलं. लोकसहभागाचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं. विषाणूची साखळी तोडण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी स्वत:हून संभाव्य बाधितांचा शोध घेणं, त्यांची चाचणी करणं, विलगीकरण करणं आणि उपचार करणं हे उपाय वेगानं राबवण्यात आले. त्यातूनच धारावी भोवती पडलेला करोनाचा विळखा सैल झाला.
जागितक आरोग्य संघटनेनं एका ट्विटच्या माध्यमातून जगभरात करोनाविरोधात राबवण्यात येत असलेल्या आक्रमक उपाययोजनांचं कौतुक केलं आहे. न्यूझीलंड, व्हिएतनाम, इटली, स्पेन, कोलंबिया, थायलंड या देशांतील करोना लढ्याचा उल्लेख करताना ‘हू’ ने धारावीचाही गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ‘जगभरात करोना रुग्णांची संख्या 1 कोटी 20 लाखांच्या वर गेली आहे. मागील सहा आठवड्यांत दुपटीहून अधिक रुग्ण वाढले आहेत. कोविडचा असा उद्रेक झाला असला तरी तो नियंत्रणात आणला जाऊ शकतो हे जगभरातील अनेक देशांनी दाखवून दिलंय. मुंबईतील धारावी हे सुद्धा त्यातलंच एक उदाहरण आहे,’ असं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस ग्रेब्रेसस यांनी म्हटलंय.
धारावीतील करोनाविरोधी लढ्याची दखल घेतल्याबद्दल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे आभार मानले आहेत. व करोनाविरोधी लढा असाच सुरू ठेवूया,’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |