पुसेगाव: पुसेगाव पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत निवडणूक व श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी पोलिसांतर्फे पुसेगावमधून जातीय दंगा काबू योजनेंतर्गत रूट मार्च काढण्यात आला.
पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्यासह एक अधिकारी, 15 पोलिस अंमलदार, 10 होमगार्ड व एक आरसीपी पथक यांनी या रुटमार्च मध्ये सहभाग घेतला होता. यावर्षी 8 ते 18 जानेवारी हा श्री सेवागिरी महाराजांचा यात्रा कालावधी आहे. याच कालावधीत 15 जानेवारी रोजी पुसेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा कालावधीत प्रथमच हा निवडणूकीचा प्रसंग आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा कालावधीत संपूर्ण राज्यातून लाखो भाविक भक्तांची हजेरी असते. श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव हा यात्रेचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. परंतू भाविकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा होण्याची शक्यता असल्याने प्रांताधिकार्यांनी 11 ते 13 जानेवारी या कालावधीत पुसेगाव येथे जमावबंदी व संचारबंदीचा आदेश दिला आहे. तर रथोत्सवादिवशी (ता.12) अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यात्रा कालावधीतच पुसेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु असून 15 जानेवारी रोजी मदतानाचा दिवस आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव व पंचायत समितीचे माजी सदस्य मोहनराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी महाविकास आघाडी आणि युवानेते माजी उपसरपंच रणधीर जाधव व सुनिलशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी जनशक्ती संघटना एकमेकांच्या समोर ठाकल्यामुळे दुरंगी लढतीचे चित्र आहे.
पथनाट्य, सोशलमिडीया व प्रत्यक्ष भेटीगाठी बरोबरच फिरत्या वाहनांवरील ध्वनीक्षेपकांद्वारे प्रचारांमुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकूणच यात्रा कालावधी व निवडणूकीची धामधूम यामध्ये शांतता व सामाजिक सुरक्षिततेला गालबोट लागू नये यासाठी पुसेगावमधील छत्रपती शिवाजी चौक, शासकिय विद्यानिकेतन, जुने पोस्ट ऑफिय, बाचल कॉर्नर व पोलिस ठाणे या मार्गावरुन पोलिसांतर्फे रूट मार्च काढण्यात आला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |