06:52pm | Jun 19, 2022 |
- प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव : ओबीसी आरक्षणावर जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गट-गण यांची अंतिम रचना जाहीर झाली असून यात ७ नव्या गटांची भर पडली आहे. गणपतीनंतर किंवा दिवाळी अगोदर ह्या निवडणुका पार पडल्या जातील असे दिसून येत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात येणाऱ्या निवडणुकामुळे मोठ्या धामधुमीचे दिवस येत्या दोन-तीन महिन्यात येणार आहेत.
गतवेळी २०१७ साली झालेल्या निवडणूकीत ६४ पैकी ४१ जागावर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद यश संपादन करून एकहाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसला २०१२ च्या निवडणूकीपेक्षा मोठा धक्का बसला होता. २३ जागेवरून राष्ट्रीय काँग्रेस संख्या थेट ७ या एक आकडी संख्येवर येऊन पाहचली होती; तर भाजपाने आश्चर्यरित्या ६ जागा मिळवत तृतीय नंबर पटकवला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीसारखा पंँटर्न स्थानीक विकास आघाड्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीशिवाय इतर पक्ष व आघाड्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. यात प्रमुख भूमिका भाजपाची असेल. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपा सातारा जिल्हा परिषदेत सत्तेवर आल्यास कुणीही धक्का लागून घेऊ नका. कारण राजकारणात २+२=५ असेच येते, हे नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दिसून आले आहे.
तालुकानिहाय स्थिती पाहिल्यास माण तालुक्यात भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना असे तीन मोठे गट कार्यरत आहे.या तीन पक्षांतील तिरंगी लढती लक्षव्येधी ठरू शकतात .तसेच उरवरीत शिल्लक नेते व राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी होऊ शकते त्यामुळे येथे घमासान लढतीत भाजपाला आपले खाते खोलायची संधी निर्माण झाली आहे.पण आ.जयकुमार गोरे यांचा चालू केसमधील जामीन ऐनवेळी रद्द झाला तर त्याचा परिणाम तीन तालुक्याच्या निवडणुकीवर होऊ शकतो ही चिंतेची बाब सद्यस्थिती भाजपाला भेडसावत आहे.
जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचा झालेला पराभवाचे पडसाद येऊ घातलेल्या निवडणूकीत खटाव तालुक्यात दिसून येणार असे दिसत आहेत. आ.जयकुमार गोरे,महेश शिंदे माजी आ.प्रभाकर घार्गे व दिलीप येळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेप्रमाणे आघाडी करून राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची तयारी सुरू झाली आणि त्यामुळे राष्ट्रवादीला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
फलटण तालुक्यात दोन्ही राजे गट एकामेकांसमोर नेहमी ठाकणार आहेत. यात खासदार गट रासप, शिवसेना सारख्या लोकांना बरोबर घेऊन लढले तर खासदार राष्ट्रवादी समोर कडवे आव्हान निर्माण करू शकतात.
कोरेगांव तालुक्यात विधानसभा निवडणुकीपासून निर्माण झालेला आ.महेश शिंदे यांचा झंझावात किसनवीरच्या निवडणुकीनंतर काहीसा शांत झालेला आहे आता मात्र परिस्थिती वेगळी आहे.तालुक्यातील दोन जि.प. चार पं.स. गट त्याच्या चालू विधानसभा क्षेत्राबाहेरचे आहेत.तसेच इतर पक्षीय मंडळी यांच्याकडून त्यांना आघाडीकरून लढण्याचा दबाब येऊ शकतो तर पक्षाकडून चिन्हावर लढण्याचा जोर असेल याचा सुवर्णमध्य ते काढतात यावर त्यांचे यशपयशाचे गणित अवलंबून असणार आहे.तसेच दोन्ही छत्रपतीचे प्रभावक्षेत्र असलेल्या सातारा तालुक्यातील कोरेगांव विधानसभा क्षेत्रात ते काय भूमिका घेतात हेही महत्वाचे आहे.
कराड उत्तर व दक्षिण मिळून झालेल्या कराड या महसुली तालुक्यात निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवण्याची सुप्त इच्छा येथे दिसून येत आहे.पालमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँगेस तर मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राष्ट्रीय काँगेस धुरा संभाळत आहेत. अतुल भोसले हे भाजपाचे वारू सांभाळत आहेत. त्यामुळे येथे तिरंगी लढतीची शक्यता जास्त असल्याने अनेक धक्कादायक निकाल यावेळी लागू शकतात असे विश्लेषकांचे मत आहे.
पाटण तालुक्यात पारंपारीक विरोधक मध्ये लढत असेल,पण यावेळी मंत्री असल्याने शंभूराजे देसाई पक्षाच्या चिन्हांवरच निवडणुका लढवतात का नेहमीप्रमाणे पाटण विकास आघाडीचा मार्ग अवलंबतात हे पाहणे औसुक्यांचे ठरणार आहे.
सातारा विधानसभा निवडणुकीत दोन्ही राजे विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका लढण्यावर भर दिसत आहे.पण जावली तालुक्यात राष्ट्रवादी विरूध्द आ.शिवेंद्रराजे गट अशी लढत होऊ शकते.
सरतेशेवटी वाई-खंडाळा-महाबळेश्वर या तीन तालुक्याचा लेखा-जोखा पहता येथे राष्ट्रवादीला तुल्यबळ लढत देईल असा नेता नसल्यामुळे तीन तालुका मिळून एक विकास आघाडी राष्ट्रवादी समोर तुल्यबळ देऊ शकते.महाबळेश्वर मधून शिवसेना,वाईमधून मदन भोसले व भाजपा गट व खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादी सोडून अशी विभागणी होऊ शकते.
वरील सर्व गोष्टीचा अंदाज घेतल्यास राष्ट्रवादीला जिल्हाभर लढत देणारा भाजपा हा एकच पक्ष आहे.(शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा १ आमदार असूनसुध्द).त्यामुळे जिल्हा बंँके काही ठिकाणी आघाडी करून किंवा जिल्हाभर एकच आघाडी करून लढल्यास राष्ट्रवादी ताकद ताकद निश्चितपणे कमी होईल.पण त्या अक्कलहुशारी नेता आता सातारा जिल्हयात आहे की नाही मोठे औसुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |