03:31pm | May 28, 2020 |
- शशिकांत कणसे
सातारा : महाराष्ट्रात नाट्यमयरित्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सातारा जिल्हा शिवसेना कार्यरत असणार्या बड्या नेत्यांचा नजरा महामंडळावर लागून राहिल्या होत्या. एकातरी महामंडळावर आपली वर्णी लागावी यासाठी काहींनी तर देव पाण्यात घालून ठेवले आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी तर चार महिन्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण महामंडळासाठी इच्छुक असल्याची इच्छा प्रदर्शित केली होती. दरम्यानच्या काळात महामंडळासाठी प्रमुख दावेदार समजल्या जाणार्या नितीन बानुगडे-पाटील, पुरुषोत्तम जाधव यांनी यासंदर्भात चुप्पी साधत कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती, हे विशेष. दरम्यान राज्यांमध्ये सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, पेचप्रसंगात सध्यातरी महामंडळाने वाकुल्या दाखवल्यामुळे चंद्रकांत जाधव यांची मोर्चेबांधणी पाण्यात भिजून गेली असल्याचे मानले जाते.
पाच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर संख्याबळानुसार दोन्ही पक्षांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदे देण्यात आली. सातार्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांचे नाव तेव्हा चर्चेत होते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाट्यमयरित्या सासवडचे शिवसेनेचे आ. विजय शिवतारे यांची सातारच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार असतानाही शंभूराज देसाई यांना डावलले गेल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे गटातटाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाराजीचा हा सुर ओळखून अडीच वर्षातच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे पश्चिम संपर्कप्रमुख नितिन बानुगडे - पाटील यांची वर्णी लावत सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. मिळालेल्या अडीच वर्षाच्या संधीचे पाटील यांनी सोने केले होते.
नितिन बानुगडे- पाटील यांचा कार्यकाल संपत आला असतानाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम सुरू झाले. अनेक पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरू झाले असतानाच दोनवेळा खासदारकीच्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी असणार्या पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एका दमदार नेत्याचा शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांना वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी शिवसेनेकडून मिळणारच यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाची शिवसेनेची उमेदवारी भाजपचे उमेदवार मदन भोसले यांना देण्यात आली, हा इतिहास सर्वांना सर्वश्रूत आहे.
विधानसभांच्या निवडणुका झाल्यानंतर नाट्यमयरित्या सत्तेवर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय कॉंग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना महामंडळे खुणावू लागली. त्यामध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांचा. काही माध्यमांशी बोलताना त्यांनी तशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. जवळपास सर्वच जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याचा समूळ नाश करण्यासाठी प्रथम प्राधान्य देत त्या दिशेने पावले उचलल्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय उलाढाली ठप्प झाल्या. त्यातच सध्या कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यात विद्यमान सरकारला अपयश येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला असून काही नेत्यांनी तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केल्यामुळे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. परिणामी महामंडळाच्या नियुक्त्या राजकीय उलाढालीच्या आड गेल्यामुळे अनेक इच्छुकांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली. कोरोनामुळे चंद्रकांत जाधव यांची मोर्चेबांधणी पाण्यात गेली असली तरी नितीन बानगुडे- पाटील आणि पुरुषोत्तम जाधव यांनी महामंडळ बाबत साधलेली चुप्पी बरेच काही सांगून जाते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |