11:30am | Apr 23, 2021 |
फलटण : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जोरात सुरू झाला आहे. राज्यात दररोज हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यातही दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. मात्र स्वत:ची व आपल्या कुटुंबातील लोकांची परवा न करता गरिब लोकांना आपल्याकडून काहीतरी मदतीचा हात मिळावा म्हणून फलटणमधील काळे परिवारातील अमोल काळे, कुमार काळे, योगेश काळे, संतोष काळे हे सर्वज्ञ ऍम्ब्युलन्स सर्व्हिसच्या माध्यमातून नेहमी 24 तास उपलब्ध असतात.
गरिबांची मदत करताना हे काळे बंधू कधीच मागे-पुढे हटत नाहीत. गेल्या 15 वर्षांपासून रुग्णांच्या सेवेसाठी काळे बंधू सतत झटत असतात. तसे पाहता तर कोविड-19 च्या काळामध्ये ऍम्ब्युलन्स ला खूप महत्त्व आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक स्वत: ऍम्ब्युलन्स मध्ये बसत नाहीत. मात्र या काळात सुद्धा काळे बंधू लोकांच्या सेवत कायमच आहेत.
फलटण मधून एक कोविड पॉझिटिव्ह अत्यंत बिकट अवस्थेत होता त्याचा एच.आर.टी.सी. स्कोअर हा 20 होता. त्याला कोविडचा अतिसंसर्ग झाला होता. त्याच्यापासून त्याच्या काही अंतरावर असलेल्या लोकांना कोविड 19 होण्याची दाट शक्यता होती. मात्र सर्वज्ञ ऍम्ब्युलन्स सर्व्हिसचे मालक कुमार काळे हे आपल्या जिवाची पर्वा न करता त्या रुग्णांची सेवा म्हणून स्वत: पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी घेऊन गेले.
रुग्णाला दोन तासाच्या आत पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे होते. परंतु तो रुग्ण कुमार काळे यांनी केवळ दीड तासातच पुण्यामध्ये पोहोचवला व त्या रुग्णाचे प्राण वाचले. तसेच महाराष्ट्र राज्यातील व देशातील अनेकांचे जीव काळे बंधूंनी वाचवले आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |