04:31pm | Sep 25, 2020 |
सातारा : मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी व कामगार विधेयकांवरुन देशभरात शेतकरी व कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरल्या आहेत. सातार्यातही केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांवर लादलेले विधेयक मागे घेण्याची विनंता वजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.
यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर हे विधेयक मागे घेतले गेले नाहीतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन छेडतील, असा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला. देशभरात या विधेयकाला तीव्र विरोध होत असून सरकारने याचा गांभीर्याने विचार करुन हे विधेयक तत्काळ मागे घ्यावे, हे सरकार भांडवलदारांचे पोषण आणि शेतकरी बांधवांचे शोषण करत असल्याचा आरोपही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
केंद्र सरकारने बहुमताच्या आधारावर घाईघाईने शेतकरी व कामगार विरोधी अध्यादेशाचा कायदा मंजूर करत शेतकरी व कामगार बांधवांची मोठी फसवणूक केली आहे. या कृतीचा साता-यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे विधेयक फाडून शेतकरी, कामगार बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, हेमंत मोरे तसेच कामगार शेतकरी संघर्ष समितीचे अस्लम तडसरकर, विक्रांत पवार, भारतीय किसान सभेचे शिवाजीराव नलवडे, शंकर पाटील, विष्णू घाडगे आदींसह शेतकरी व कामगार उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |