05:04pm | Nov 30, 2020 |
सातारा: राज्यातील कोविड-19 च्या आपातकालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी झालेले आहे. समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेवून निदाननिश्चित्ती नंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान सातारा जिल्हयामध्ये 1 डिसेंबर 2020 ते दि.16 डिसेंबर 2020 राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
कुष्ठरोग शोध माहिमेंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर दहा लाख लोकसंख्येमागे एकपेक्षा कमी करणे, समाजात कुष्ठरोगा विषयी जनजागृती करणे कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे.
क्षयरोग शोध मोहिमेंतर्गत क्षयरोगाचे निदाना अभावी अदयापही वंचित असणार्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आपणे. मोहीमेमध्ये प्रशिक्षीत पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणार्या व्यक्तींना शोधणे. संशयीत क्षयरुग्णांचे धुंकी नमुने व एक्स रे तपासपी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे समाजात क्षयरोगा विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आठल्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |