04:13pm | Sep 28, 2020 |
मुंबई: पावसाचा परतीचा प्रवास यंदा उशिरा सुरू झाला असला तरी हा प्रवास यंदा लवकर संपणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाच्या परतीच्या प्रवासाला आज (28 सप्टेंबर) पासून सुरुवात झाली. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा 11 दिवस उशिराने सुरू झाला.
भारतीय हवामान विभागाने पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या आठवडयात राजस्थानच्या वायव्येस पावसाचे प्रमाण कमी असून आठवडयाच्या मध्यावर नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. 17 सप्टेंबर ही पावसाच्या परतीचा प्रवासाची सरासरी तारीख असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले होते.
सर्वसाधरणपणे पावसाच्या परतीचा प्रवासाची सुरुवात ही 17 सप्टेंबरला होते. त्यानंतर महिनाभरात संपूर्ण देशातून नैऋत्य मोसमी पाऊस संपतो. यावर्षी ती 11 दिवस उशिराने झाली आहे, मात्र त्याचा परतीचा प्रवास नेहमीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थान, पंजाबच्या आणखी काही भागातून आणि दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून पावसाचा परतीचा प्रवास झाला असेल.
पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक असे वातावरण तयार होत असून 28 सप्टेंबर पासून त्याचा परतीचा प्रवास सुरु होऊ शकतो, असे हवामान विभागाने या अगोदरच स्पष्ट केले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |