09:05pm | Jan 31, 2023 |
कराड : कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेने शिंदेवाडी येथील दरोडयाचा गुन्हा 72 तासांत उघडकीस आणत पाच आरोपींना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश रघुनाथ खबाले वय 51 वर्षे व्यसवाय-खडी क्रेशर विक्री रा.विंग ता.कराड जि.सातारा हे दिनांक 27.01.2023 रोजी रात्रौ 08.20 वा.चे.सुमारास त्याचे श्री.दत्त गुरु स्टोन क्रेशरवर दिवसभर झालेल्या व्यवहाराची रक्कम 2 लाख 2 हजार ही पिशवीत घेवुन त्याची बोलेरो जीप क्रमांक एम.एच.50.जे.6037 ने घरी जात असताना अज्ञात इसमांनी त्यांना शिंदेवाडी, ता.कराड गावाजवळ अडवुन, त्यांना धाक दाखवुन पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेले होते. म्हणुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील हे करत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आरोपी यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एक पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन दिले व या गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने त्यांना बारामती ता.बारामती जि.पुणे येथे जाण्याबाबत सांगितले.
पथकाने सी.सी.टीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाचे आधारे बारामती परीसरातुन या गुन्हयातील 5 आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करुन त्यांचा गुन्हयातील सहभाग असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपीत यांना न्यायालयाने दिनांक 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, कराड पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक अलीअहमद मुल्ला, पो.हवा. महेश लावंड, पो.हवा. उत्तम कोळी, पो.ना. सज्जन जगताप, पो.ना. सचिन निकम, पो.ना. सचिन सांळुखे यांनी केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |