04:39pm | Sep 25, 2020 |
कोरेगाव: कोरोना संकटाचा सामना करताना सर्वसामान्यांना सद्यस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ, उपचाराचा खर्च, औषधांची उपलब्धता अशा अनेक समस्यांना तोंड देणार्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी ‘राष्ट्रवादी हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली असून हा उपक्रम ना नफा ना तोटा तत्वावर सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यांतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाबरोबरच पुसेगाव, खटाव आणि वडूथ येथील नवीन शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव केले जाणार असून, शासनाकडून आणि व्यक्तिगत माझ्या वतीने सर्वतोपरी व्यवस्था केली जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांना लवकर उपचार मिळावेत, त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात विशेष हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. गरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, असा प्रयत्न असून, गरिबांना लागणारी औषधे व इंजेक्शने ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील कोविड सेंटरची क्षमता 30 वरून 100 खाटांपर्यंत वाढवून या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुसेगाव आणि खटावमध्येही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सातारा तालुक्यातील 18 गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वडूथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधांनीयुक्त कोविड सेंटर उभारण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे आमदार शिंदे यांनी नमूद केले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |