12:37pm | Sep 28, 2022 |
सातारा : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रामचंद्र देखणे यांची श्रद्धांजली सभा बुधवार दि .28 सप्टेंबर 2022 रोजी दीपलक्ष्मी संस्कृतिक हॉल 759 अ, शनिवार पेठ सातारा येथे सायंकाळी 4 वा. आयोजन केले आहे. डॉ. रामचंद्र देखणे यांचे दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी आकस्मित निधन झाले असून त्यांना दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
संत साहित्याचे व लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व भारुडाचार्य डॉ. रामचंद्र देखणे हे प्रभावी वक्ते, निष्णात कलावंत व थोर साहित्यिक होते. दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजित केलेल्या पहिल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव मध्ये त्यांचे " संत साहित्यातील पर्यावरण" या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले असून त्यांना संस्थेने वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित केले होते. सातारा जिल्हा ग्रथमहोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देखणे उपस्थित होते. त्यांनी भारुडाचा स्वतंत्र कार्यक्रम करुन रसिकांची मने जिंकली होती, अशी माहिती म.सा.प पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस व ग्रथमहोत्सवाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे यांनी दिली .
विद्यावाचस्पती डॉ.रामचंद्र देखणे यांचे सातारच्या समर्थ सदन येथे दि. 17 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022 असे चार दिवस प्रवचन होते. या कालावधीमध्ये त्यांचा संस्थेशी व इतरही संस्थांशी संबंध येऊन पुढील कालावधीत सातार मधील विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तरी डॉ. रामचंद्र देखणे यांच्याशी संबंधित सर्वांनी सदर श्रद्धांजली सभेस उपस्थित राहून आपली श्रद्धांजली अर्पित करावी असे आवाहन प्राचार्य यशवंत पाटणे व म. सा.प.पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस व सातारा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |